Video : समुद्रकिनारी दिसला विचित्र सापळा, समोरचं दृश्य पाहून वैज्ञानिकही थक्क!
समुद्रात अनेक धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या घटना घडतात. काही वेळा तर संशोधकांनाच आव्हान देणाऱ्या आकृती समुद्रात पाहायला मिळतात. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर लोकांना एका अजब जीवाचा सांगाडा सापडला आहे. हा सांगाडा पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत असून संशोधकही त्याबाबत माहिती जमवण्याच्या कामाला लागले आहेत.

Skeleton Found On sea : समुद्रातलं विश्व फारच गुढ आहे. खोल समुद्रात कोणकोणते जीव राहतात हे अजूनही मानवाला पुरेसं समजू शकलेलं नाही. कधीकधी तर समुद्रात अनेक धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या घटना घडतात. काही वेळा तर संशोधकांनाच आव्हान देणाऱ्या आकृती समुद्रात पाहायला मिळतात. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर लोकांना एका अजब जीवाचा सांगाडा सापडला आहे. हा सांगाडा पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत असून संशोधकही त्याबाबत माहिती जमवण्याच्या कामाला लागले आहेत.
नेमकं काय घडलं?
तुम्ही अनेकदा जलपरी हा शब्द ऐकला असेल. समुद्रात खोल आणि अज्ञात स्थळी जलपरी असतात असे काही लोक म्हणतात. या दाव्याला मात्र अजूनतरी कोणताही शास्त्रीय आधार सापडलेला नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समुद्रकिनारी जलपरीचा एक सापळा दिसत असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे वैज्ञानिकांच्या हाताला हा सापळा लागला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक मीटर लांब आकृती दिसतेय. या आकृती दुसरे तिसरे काही नसून पुढे माणूस आणि मागे माशाचा आकार असलेल्या जलपरीचा सांगाडा असल्याचे बोलले जात आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार एक मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गेला होता. त्यावेळी मच्छीमाराला हा सांगाडा दिसला. या सापळ्याला आता मरीन बायोलॉजी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. आता या कथित सापळ्याचा संशोधकांकडून अभ्यास केला जात आहे. एक्स रे, सीटी स्कॅन, डीएनए टेस्टच्या माध्यमातून हा सापळा नेमका कशाचा आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर हा सापळा सापडलेला आहे.
सापडलेला सापळा आहे तरी कोणाचा?
दरम्यान, समुद्रकिनारी आढळलेला हा सापळा 19 व्या शतकातील फिजी जलपरीसारखा असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे काही युफोलॉजिस्ट, क्रिप्टोलॉजिस्ट यांच्या म्हणण्यांनुसार हा सापळा जलपरीच्या छोट्या बाळाचा आहे. जलपरीच्या सापळ्यासारखा दिसणारा हा जीव खोल समुद्रात राहात असावा, असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे आता या सापळ्याचा अभ्यास केला जात असून या अभ्यासातून नेमके काय समोर येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
