
अमेरिका आणि इस्राईलने जेव्हा इराणविरोधात ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत मोठे हवाई हल्ले सुरु केले तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आशा होती की तेहरानमध्ये लवकरच सत्तापालट होईल. परंतू युद्ध सुरु झाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यानंतरही इराणची इस्लामिक सरकार प्रत्युत्तराची कारवाई करत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की इराणही क्षमता त्याच्या सैन्य रणनिती ‘मोजेक डिफेन्स’मुळे झाली आहे. जिला इराणी रणनितीकार मोहम्मद अली जाफरी यांनी विकसित केले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी सांगितले की ही संरक्षण रणनिती दोन दशकांच्या अभ्यासातून तयार झाली आहे. ज्यात अमेरिकेच्या सैन्य पराभवातून धडा घेतला आहे.
तेहराणवर बॉम्ब हल्ले होऊनही इराणच्या युद्ध क्षमतेवर जास्त परिणाम यामुळे झालेला नसल्याचे रराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी म्हटले आहे.मोजेक डिफेन्समुळे युद्ध केव्हा आणि कसे समाप्त होणार, याचा निर्णय इराण स्वत: करु शकतो. अमेरिकन- इस्राईली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर हे वक्तव्य अराघची यांनी केले आहे.
मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांना इराणच्या ‘मोजेक डिफेन्स’ रणनितीचा मुख्य निर्माता म्हटले जाते. ते २००७ ते २०१९ पर्यंत इस्लामी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे ( IRGC ) प्रमुख होते. या संघटनेला इराणची सर्वात शक्तीशाली सैन्य ताकद मानले जाते.
असे म्हटले जाते इस्लामिक क्रांती नंतर जाफरी यांनी इराणच्या कुर्दिस्तान क्षेत्रातील गुप्त संस्थेत काम करायला सुरुवात केली आणि नंतर देशाचे सैन्य धोरणाला नवे रुप देण्यात महत्वाची भूमिका निभावली.
जाफरी यांनी इराण-इराक युद्धात सहभाग घेतला होता. आणि हळूहळू ते आयआरजीसीत मोठ्या पदापर्यंत पोहचले. १९९२ मध्ये त्यांना आयआरजीसीच्या स्थल सैन्याचे कमांडर बनवण्यात आले. त्यानंतर संघटनेची एक खास युनिट ‘सरअल्लाह’चे नेतृत्व देखील सोपवले.
२००५ मध्ये जाफरी यांना आयआरजीसीच्या रणनिती अध्ययन केंद्राचे संचालक बनवले. जेथे त्यांनी इराण-इराक युद्ध आणि २००३ मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराकवर झालेल्या हल्ल्यातून धडा घेऊन ‘मोजेक डिफेन्स’ ची पायाभरणी केली.
मोजेक डिफेन्स रणनिती हे एक धोरण आहे ज्यात संपूर्ण संरक्षण ढाच्याला अनेक क्षेत्रीय आणि अर्ध – स्वतंत्र भागात वाटण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये आयआरजीसी, बसीज बल, नियमित सेना, मिसाईल युनिट, नौदल आणि स्थानिय कमांड मिळून एक विकेंद्रीत परंतू मजबूत व्यवस्था तयार होते.
याचा अर्थ जर एखाद्या भागात हल्ला झाला आणि शीर्ष नेतृत्व संपले तरीही इतर सैन्य तुकड्या काम करत रहातात. या रणनितीचे पहिले लक्ष्य इराणच्या कमांड व्यवस्थेला संपूर्णपणे नष्ट करणे शत्रूला खूप अवघड व्हावे.
दुसरे लक्ष्य हे की युद्धाचे मैदान इतके जटिल बनवावे की कोणत्याही ताकदवान देशाला युद्धाला लवकर समाप्त करणे सोपे न होवो. या रणनितीत हे देखील मानले गेले आहे की अमेरिका वा इस्राईल सारख्या शक्तीशाली देशाशी युद्धाच्या स्थितीत जर केंद्रीय नेतृत्व तुटले तरी स्थानिक आघाड्या स्वतंत्रपणे युद्ध सुरुच ठेवतील.
ही रणनिती त्यावेळी मजबूत झाली होती. जेव्हा अमेरिकेने २००१ साली अफगाणिस्तान आणि २००३ मध्ये इराकवर हल्ला केला. इराकमध्ये सद्दाम हुसैन याचे सरकार वेगाने कोसळल्याचा इराणसाठी मोठा धडा मिळाला.यानंतर तेहराणने त्यांचे सैन्य केंद्रीकृत करण्याच्या ऐवजी विकेंद्रीत करुन विविध भागात मजबूत बनवण्याची रणनिती स्वीकारली. ज्यास आज ‘मोजेक डिफेन्स’ म्हटले जाते.