अखेर 3000 कार घेऊन जाणारं महाकाय जहाज बुडालं; मॉर्निंग मिडासचं अस्तित्व संपलं!
प्रशांत महासागरात मोठी दुर्घटना घडली आहे. आग लागलेल्या मॉर्निंग मिडास या जहाजाला अखेर जलसमाधी मिळाली आहे.

समुद्रात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अथांग सागरात चुकूनही काही अघटीत घडलं की शेकडो फूट खोल असलेलं पाणी सगळ्यांनाच गिळून घेतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आह. मॉर्निंग मिडास नावाच्या एका मालवाहू जहाजाला थेट जलसमाधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या कार्गो जहाजात तब्बल 3000 कार होत्या. या सर्व कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्या आहेत.
नेमकं काय घडलंय?
मिळालेल्या माहितीनुसार मॉर्निंग मिडास नावाच्या कार्गो शिपला आठवडाभरापूर्वी भर समुद्रात आग लागली होती. या दुर्घटनेमुळे जलवाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या जहाजावर तब्बल 3000 नव्याकोऱ्या कारची वाहतूक केली जात होती. या कारमध्ये 70 इलेक्ट्रिक व्हेइकल, 680 हायब्रिड कार होत्या.मिळालेल्या माहितीनुसार हे महाकाय जहाज चीनहून निघाले होते. ते मेक्सिकोला जात होते. मात्र मध्येच प्रशांत महासागरात असतानाच या जहाजाला अचानक आग लागली. ही आग विझविण्याचा प्रयत्न केला जात होता. पण ती विझविण्यात यश आले नाही. परिणामी हे आता समुद्रात बुडून गेले आहे.ही दुर्घटना अलास्का येथे अलेउतियन द्वीप समुहाजावळ घडली आहे.
आग कशी लागली, जहाज कसं बुडाल?
मॉर्निंग मिडास हे व्यापारी जहाज मेक्सिकोला जात होते. मात्र 3 जून रोजी या जहाजाला आग लागली. हे जहाज Adak Islandच्या जवळपास 490 किमी दूर होते. त्यावेळीच या जहाजाला आग लागली होती. ही आग एवढ्या वेगाने पसरली की तिला पूर्णपणे विझविता आले नाही. आगीचा भडका उडाल्यामुळे ते पुर्णपणे निष्क्रिय झाले. परिणामी आग लागल्याच्या काही दिवसांनंतर हवामान खराब झाल्याने आणि जहाजात पाणी शिरल्याने ते समुद्राच्या पाण्यात बुडून गेले. मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज 5000 मीटर खोल समुद्रात बुडाले आहे.
🚨Cargo ship Morning Midas sinks in Pacific Ocean after days of fire
3,000 cars onboard, including 800 EVs, Lithium batteries, 1500 tons of fuel now sitting 16,000 feet underwater. Pollution risk being monitored#morningmidas pic.twitter.com/r6u31EB1zC
— Nabila Jamal (@nabilajamal_) June 25, 2025
22 क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश
या मालवाहू जहाजाला आग लागल्यानंतर जहाजातील क्रू मेंबर्सना वाचवण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. या मोहिमेत एकूण 22 क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आले. जवळून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजाने त्यांना सुरक्षितपणे वर काढलं.
26 जून रोजी जहाज निघाले पण…
दरम्यान, हे जहाज तब्बल 600 फूट लांब होते. या जहाजाची निर्मिती 2006 साली करण्यात आली होती.लायबेरिया येथे या जहाजाची नोंद आहे. 26 जून रोजी हे जहाज चीनमधील यांतई बंदराहून निघाले होते.मेक्सिको येथील बंदरावर जाऊन हे जहाज थांबणार होते. मात्र तिथे पोहोचण्याआधीच या जहाजाला भर समुद्रात आग लागली आणि ते बुडाले.
