AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात भीषण दुर्घटना; प्रवाशांनी भरलेलं जहाज बुडालं; 500 हून अधिक जणांच्या मृत्यूची शक्यता

बंगालच्या उपसागरात भीषण दुर्घटना घडली आहे. रोहिंग्या निर्वासिंतांचं जहाज समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे.

समुद्रात भीषण दुर्घटना; प्रवाशांनी भरलेलं जहाज बुडालं; 500 हून अधिक जणांच्या मृत्यूची शक्यता
Image Credit source: social sites
| Updated on: Jul 17, 2026 | 1:49 PM
Share

म्यानमारच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात भीषण जहाज दुर्घटना घडली आहे. रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणारे 2 जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने दिली. खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना आणि संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्थेने एकत्र निवदेन देखील जारी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जून्या शेवटच्या आठवड्यात 500 हून अधिक रोहिंग्या हे म्यानमारच्या पश्चिम रखाइन राज्यातून निघाले. त्यांच्या एका जहाजात 250 जण होते. तर दुसऱ्या जहाजात जवळपास 300 जण होते. दोन्ही जहाजे रखाइनहून निघाल्यानंतर काही वेळानंतर अचानक बेपत्ता झाले. दोन्ही जहाज हे बंगालच्या उपसागरात म्यानमारच्या इरावदी किनाऱ्याजवळ बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही जहाजातील 500 हून अधिक जण बुडाल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेत नेमकं किती जणांचा मृत्यू झाला, याचा अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. परंतु जहाजामधील बेपत्ता लोकांविषयी कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्यांचे मृतदेह देखील हाती लागलेले नाहीत. ते जिवंत असल्याचीही कोणती माहिती हाती आलेली नाही. ऐन पावसाळ्यात बंगालचा उपसागर खवळलेला असतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याच्या शक्यता अधिक असते, त्यामुळे दोन जहाज बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. बांगलादेशतही निर्वासितांचीही संख्या अधिक आहे. हिंसाचारामुळे रोहिंग्या निर्वासित जीव धोक्यात घालून समुद्रातून प्रवास करत आहे. काही रोहिंग्या बांगलादेशातील देखील आहेत. सर्व रोहिंग्यांना मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये जाऊन आयुष्याची नवीन सुरुवात करायची होती. परंतु दुसऱ्या देशात जाण्याआधी रोहिंग्याचं जहाज बुडालं. याआधी देखील अनेक दुर्घटना घडल्या आहेत. कोणत्याही सुरक्षेशिवाय जहाजातून प्रवास केल्याने अनेक रोहिंग्यांना जीव गमवावा लागला आहे. आता आणखी एक दुर्घटना घडल्याने पुन्हा रोहिंग्या निर्वासितांचा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार