AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गूढ विमान.. सहा देशांच्या ट्राफिक कंट्रोल सिसिट्म्सना चकवा देत गेले विमान, उडाला एकच गहजब, फायटर जेट्स पाठवले

नाटो देशांच्या हवाई हद्दीत अनोळखी विमान दिसल्याने, हंगेरी आणि रोमानिया या देशांचे फाईट जेट्स एक्टिव्ह झाले. या विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने फायटर जेट्स विमानांनी या विमानाचा पाठलाग करण्यात आला. यानंतर हे विमान हंगेरीच्या एका छोट्या एयरपोर्टवर लँड झाले. या ठिकाणी उतरल्यानंतर अधिकारी या विमानाची काही चौकशी करतील, त्यापूर्वीच इंधन भरुन हे विमान उडाले.

गूढ विमान.. सहा देशांच्या ट्राफिक कंट्रोल सिसिट्म्सना चकवा देत गेले विमान, उडाला एकच गहजब, फायटर जेट्स पाठवले
Mysterious plane (1)Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 6:10 PM
Share

नवी दिल्ली – एक विमान एयर डिफेन्स सिस्टिमला चकवा देत 6 नाटो देशांवरुन उडाले, आणि याची कोणतीही माहिती या सहा राष्ट्रांना मिळूच शकली नाही. ही बाब समोर आल्यानंतर एकच गहजब झाला. त्यानंतर या विमानाचा पाठलाग करण्यासाठी काही फायटर जेट्स रवाना करण्यात आले. त्यानंतर पाठलागानंतर या विमानाचे लँडिंग करण्यात आले. या विमानाची तपासणी केल्यानंतर, सुरक्षा यंत्रणांना दुसरा धक्का बस,ला. या विमानात ना पायलट होता ना प्रवाशी होते. आता या घटनेचा तपास करणारे सगळेच आश्चर्यचकित आहेत. आता गबढ विमानाबद्दल चौकशी करण्यात येते आहे. हे विमान एक नव्हे तर सहा देश ओलांडून आणि सुरक्षा यंत्रणांना चकवा देत बुल्गारियापर्यंत पोहचले कसे, याचा शोध आता घेण्यात येतो आहे.

अतिशय कमी उंचीवर उडत होते विमान

या प्रकरणात बुल्गेरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अज्ञात विमानाने बुधवारी देशाच्या हवाई सीमेत प्रवेश केला. या विमानाकडून कोणताही धोका नव्हता, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. हे विमान कमी उंचीवरुन उडत होते. त्यामुळे त्याच्याबाबत माहिती घेणे सोपे गेल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप चौकशी सुरु असल्याचेही अधिकाऱअयांनी स्पष्ट केले आहे.

6 देशांच्या एयर डिफेन्सला दिला चकवा

बुल्गारिया देशाच्या सीमेत प्रवेश करण्यापूर्वी हे गूढ विमान, हंगेरी आणि रोमानिया एयरफोर्सला दिसले होते. त्यानंतर पोलंड, स्लोवाकिया,बुल्गारिया आणि लिथुआनिया या देशांच्या हवाी सीमेतून या विमानाने प्रवास केला होता.

नाटो देश एक्टिव्ह मोडवर

नाटो देशांच्या हवाई हद्दीत अनोळखी विमान दिसल्याने, हंगेरी आणि रोमानिया या देशांचे फाईट जेट्स एक्टिव्ह झाले. या विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने फायटर जेट्स विमानांनी या विमानाचा पाठलाग करण्यात आला. यानंतर हे विमान हंगेरीच्या एका छोट्या एयरपोर्टवर लँड झाले. या ठिकाणी उतरल्यानंतर अधिकारी या विमानाची काही चौकशी करतील, त्यापूर्वीच इंधन भरुन हे विमान उडाले. त्यानंतर ते शेजारचे राष्ट्र असलेल्या बुल्गेरियात एका शेतात सापडले. या ठिकाणी या टू सिटर विमानाचा तपास करण्यासाठी जेव्हा अधिकारी पोहचले, तेव्हा ना त्या विमानात पायलट होते ना कोणी प्रवासी होते.

सात देशांच्या सीमा केल्या पार

बुल्गेरियाच्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान लिथुआनियाहून उडाले होते. त्यानंतर पोलंड, स्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया आणि सर्बियासहित बुल्गारियात उतरण्याच्या काळत सात देशांतून या विमानाचा प्रवास झाला. यातील सर्बिया सोडल्यास सहाही देशांचा समावेश नाटो देशांमध्ये होतो. हंगेरीत काही काळासाठी जेव्हा हे विमान इंधन भरण्यासाठी थांबले होते, तेव्हा त्याच्यातून 5 ते 6 जण उतरले होते, अशी माहिती मिळाली आहे. हंगेरी पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सगळे पळाले. अशीही माहिती मिळते आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.