Sunita Williums : NASA कडून झटका, अवकाशात अडकलेल्या सुनीता विलियम्स संदर्भात एक निराशाजनक बातमी

Sunita Williums : अवघ्या दोन आठवड्याच्या मिशनसाठी भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स अवकाशात गेली होती. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरच हे मिशन होतं. पण सुनीता विलियम्स आता तिथे अडकून पडली आहे. तिला पृथ्वीवर सुरक्षित परत आणण्याच नासासमोर चॅलेंज आहे. त्यासाठी नासाकडून वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरु आहे.

Sunita Williums : NASA कडून झटका, अवकाशात अडकलेल्या सुनीता विलियम्स संदर्भात एक निराशाजनक बातमी
sunita williums and butch wilmoreImage Credit source: NASA
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 1:06 PM

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स अवकाशात अडकून पडली आहे. सुनीत पृथ्वीवर सुरक्षित कधी परतणार? हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सुनीता विलियम्सच्या पृथ्वीवर परतण्याची प्रतिक्षा वाढतच चालली आहे. सुनीता विलियम्ससोबत बुच विल्मोर हा अंतराळवीर सुद्धा आहे. NASA कडून जी माहिती देण्याता आलीय, त्याने मोठा झटका बसला आहे. दोन महिन्यापूर्वी 5 जूनला बोइंगच्या स्टारलायनर यानाने 13 दिवसाच्या म्हणजे दोन आठवड्यांच्या मिशनसाठी सुनीता अवकाशात गेली होती. आता दोन महिने होत आले, तरी अजून ती पृथ्वीवर परतलेली नाही. आपल्या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित आणण्यासाठी नासा स्टारलायनर यानाशिवाय दुसऱ्या पर्यायांचा सुद्धा विचार करत आहे. हे दोन्ही अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आहेत.

सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोरला पृथ्वीवर परतण्यासाठी आणखी काही महिन्यांची प्रतिक्षा करावी लागू शकते. स्टारलायनर अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोरला अवकाशातून पृथ्वीवर परत आणण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला अशी माहिती नासाने रात्री उशिरा दिली. “NASA ने ज्या पर्यायांचा विचार केला, त्यात असा सुद्धा एक पर्याय आहे की, फेब्रुवारी 2025 पर्यंत दोन्ही अवकाशवीरांना परत आणायचं” नासाच्या एका अधिकाऱ्याने मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. हा पर्याय अंतिम झाला, तर नासा स्टारलायनर ऐवजी एलन मस्कच्या स्पेसएक्सने दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर आणेल.

पृथ्वीवर परत आणण्याचा दुसरा पर्याय काय ?

कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव स्टिच यांनी सांगितलं की, “बुच आणि सुनीताला स्टारलायनरने परत आणण्याचा नासाकडे पहिला पर्याय आहे. पण असं होऊ शकलं नाही, तर आमच्याकडे बरेच दुसरे पर्याय आहेत” “नासाच क्रू 9 ला अवकाश मिशनवर पाठवण्यासाठी स्पेसएक्स सोबत मिळून काम सुरु आहे. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोरचा क्रू 9 मध्ये समावेश करण्याचा आमचा प्रयत्न आहे” असं स्टीव स्टिच यांनी सांगितलं.

क्रू 9 मिशन काय आहे?

दोघांना सुरक्षित परत आणण्यासाठी नासाच्या रणनितीचा त्यांनी खुलासा केला. क्रू 9 मिशन नासाने सुरु केलं, तर पुढच्यावर्षीपर्यंत थांबाव लागेल. म्हणजे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर 2025 मध्ये पृथ्वीवर परत येतील. क्रू 9 साठी आम्ही दोन अंतराळवीर येथूनच पाठवू. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर क्रू9 टीमचा भाग बनून त्यांच्यासोबत अवकाश तळावर काम करतील. मग फेब्रुवारी 2025 मध्ये चारही अंतराळवीरांना परत आणण्यात येईल. नासाने अजूनपर्यंत या प्लानला मंजुरी दिलेली नाही असं नासाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.