ना चीन, ना अमेरिका हा देश आहे कंडोम निर्मितीत सर्वात पुढे, इराण युद्धाने कसे वाढवले संकट ?
इराण युद्धामुळे इंधन टंचाई होत असताना आता कंडोमची चर्चा सुरु झाली आहे. युद्ध असेच सुरु राहिले तर कंडोमच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कंडोमच्या किंमतीत ५० टक्के वाढ होऊ शकते.

इराण आणि अमेरिका युद्ध सुरु असताना मध्येच कंडोमची देखील चर्चा होत आहे. पश्चिम आशियाच्या टेन्शनमुळे कंडोमची कमतरता जाणवत आहे. एकट्या भारताची कंडोम इंडस्ट्री ८,१७० कोटी रुपयांची असून पुरवठा साखळी क्रायसिसमुळे ती संकटात सापडली आहे. मीडियातील बातमीनुसार भारतात याच्या किंमतीत ५० टक्के वाढ होऊ शकते. हे संकट समुद्राच्या मार्गाने येणाऱ्या कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे निर्माण झाले आहे.
कंडोम तयार करण्यासाठी ज्या पेट्रो केमिकल प्रोडक्ट, सिलीकॉन ऑईल आणि अमोनियाचा वापर केला जातो, त्याच्या पुरवठ्यात कमतरता निर्माण झाली आहे. आता त्यांच्या किंमतीत वाढ होण्याची चर्चा आहे. अमोनियाच्या किंमतीत ५० टक्के वाढ होण्याचा दावा केला जात आहे. जगातील अनेक देश कंडोमची निर्मिती करतात. परंतू काही देशा याबाबतीत पुढे आहेत.
कंडोमचा सर्वात मोठा एक्सपोर्टर कोण?
ब्लूमबर्गच्या बातमीनुसार केवळ ६ कोटीची लोकसंख्या असलेला थायलंड हा कंडोम एक्सपोर्ट करण्यात सर्वात पुढे आहे. तर चीन आणि अमेरिका हे देश सर्वाधिक कंडोम खरेदी करतात. थायलंड सर्वात मोठा कंडोमची निर्मिती करणारा देश कसा काय बनला ? तो कंडोमचा सर्वात मोठा निर्यातदार कसा काय बनला ?
थायलंड का बनला सर्वात मोठा एक्सपोर्टर? 5 कारणे
नैसर्गिक रबराचा बालेकिल्ला : ज्या नैसर्गिक रबराने कंडोम तयार होतो, त्याचे प्रोडक्शन थायलंड येथे जास्त होते. त्यामुळे थायलंडला कच्चा माल मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत.
मॅन्युक्चरिंग इंफ्रास्ट्रक्चर: या देशाने रबराचे महत्व ओळखून लेटेस्ट प्रोडक्ट तयार करण्यासाठी ही इंडस्ट्रीज विकसित केली आणि प्रोडक्शन वाढवले. येथे हायटेक मशिन्स आहेत.त्या मोठ्या प्रमाणावर कंडोम तयार करतात.
स्वस्तातील मजूर : थायलंड येथील मजूरी स्वस्त आहे. मजूर सहज उपलब्ध होतात. नैसर्गिक रबर सहज उपलब्ध झाल्याने येथे प्रोडक्ट कमी किंमतीत तयार होते. त्यामुळे निर्यात सर्वात जास्त आहे.
सरकारचा सपोर्ट: कंडोम मॅन्युफॅक्चरिंग थायलंडच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. थायलंड सरकारने याची निर्यात वाढावी यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकारने करसवलत देण्यासोबतच इंडस्ट्रीयल झोनची निर्मिती केली. आणि निर्यातीला प्रोत्साहन दिले. कंपन्यांचा फायदा झाल्यामुळे नंतर सरकारचा देखील आपोआप फायदा झाला.
आंतरराष्ट्रीय गुणवत्ता : थायलंडमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आहेत. थाय निपॉन रबर इंडस्ट्रीज आणि ओकोमोटो इंडस्ट्रीज.या कंपन्या सर्व आंतरराष्ट्रीय क्वालीटी स्टँडर्डचे पालन करतात. येथील कंडोमने जगभरात विश्वास निर्माण केला आहे. हे देखील थायलंडच्या कंडोम प्रगतीचे कारण आहे.
किती देशात थायलंड कंडोमची मागणी ?
जगातील ग्लोबल मार्केट शेअरमध्ये थायलंडचा वाटा ४४ टक्के आहे. हा २०२५ चा आकडा आहे. जगातील १७६ देश थायलंडमधून कंडोम खरेदी करतात. चीन, अमेरिका आणि व्हिएतनाम हे सर्वात मोठे आयात करणारे देश आहेत. आता मध्य पूर्वेतील संकटाने कच्च्या मालाचे संकट निर्माण झाले आहे.
पीव्हीसी फॉईल, एल्युमिनियम फॉईल आणि पॅकेजिंग सामुग्रीच्या पुरवठ्यात कमी आणि किंमतीतील चढ उताराने उत्पादन आणि मागणीवर परिणाम झाला आहे. लॉजिस्टीकमध्ये आलेल्या अडचणींमुळे या संकटाला आणखी वाढवले आहे. इराण युद्धाने भारतातील कंडोम बाजाराची स्थिती आणखी जटील बनली आहे असे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.