AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर

नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजलाय. परंतु चीनने वेळेत माहिती न दिल्याने नुकसान होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर आता चीनने अप्रत्यक्षरित्या प्रत्युत्तर दिलं आहे.

नेपाळमध्ये आलेला पूर Made in China का? अखेर बिजींगने दिलं उत्तर
nepal flood update Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 11:06 AM
Share

नेपाळच्या तिबेट सीमेवर आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. सीमेवरील पुरावरून चीनच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. चीनने पुराची आधीच माहिती दिली नाही, त्यामुळे नेपाळचं अधिक नुकसान झालं, असा आरोप एका पत्रकाराने केला. या आरोपामुळे दोन्ही देशांमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता या वादावर नेपाळमधील चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच त्यांनी चीन नेपाळमध्ये करत असलेल्या मदतीची देखील माहिती दिली.

चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली. ग्यिरोंग-रसुवागढी सीमा भागात नैसर्गिक आपत्तीबद्दल शोक व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी म्हटलं की, पुराममध्ये चीन आणि नेपाळमधील अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आर्थिक नुकसान देखील झालं आहे’.

राजदूत माओमिंग यांनी मृतांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली. या भीषण परिस्थितीत चीन हा नेपाळच्या मदतीला उभा आहे. पुरामुळे चीनमध्येही मोठं नुकसान झालं आहे. या व्यतिरिक्त बिजिंगमधून नेपाळसाठी आपत्कालीन मदत साहित्य आणि आर्थिक मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. झांग माओमिंग म्हणाले, ‘चीन नेपाळला सर्वोतपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल. आम्ही विश्वास व्यक्त करतो की, दोन्ही देश मिळून संकटातून बाहेर पडतील. या पूरस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी काम करत राहील’. चिनी राजदूतांनी नेपाळच्या पत्रकारांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांनी उत्तर देताना चीनने नेपाळला सहकार्य आणि आर्थिक मदत केल्याचा उल्लेख केला.

नेपाळ-चीनमध्ये पुराने हाहाकार 

ग्यिरोंग-रसुवागगढी परिसर दोन्ही देशांसाठी महत्वाचा सीमा भाग आहे. नेपाळला पूराविषयी उशिरा माहिती दिल्याचा आरोपावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण पेटलं आहे. सध्या दोन्ही देश नागरिकांसाठी मदत कार्य करताना दिसत आहे. नेपाळ आणि चीनमधील पुरात आतापर्यंत 163 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे नेपाळमध्ये 157 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 403 जण बेपत्ता झाले आहेत. तर पुरामुळे चीनमधील परिस्थिती देखील गंभीर असून 265 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ