Nepal plane crash: अपघातग्रस्त विमानाचे फोटो आले समोर

तारा एअरलाइनचे हे विमान पोखरामधून जोमसोमला निघाले होते. मात्र त्यानंतर ते मुस्तांग भागातील कोबान परिसरात कोसळले. या विमानाचे अवशेष मुस्तांग भागात आढळून आले आहेत.

Nepal plane crash: अपघातग्रस्त विमानाचे फोटो आले समोर
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 11:15 AM

रविवारी नेपाळमध्ये (Nepal) विमान कोसळून मोठा अपघात (Plane crash) झाला होता. या विमानामध्ये एकूण 22 जण होते. या प्रवाशांमध्ये तीन क्रू मेंबर्स, चार भारतीय प्रवासी, दोन जण जर्मनीचे तर एकूण 13 जण हे नेपाळचे प्रवासी होते. तारा एअरलाइनचे हे विमान पोखरामधून जोमसोमला निघाले होते. मात्र त्यानंतर ते मुस्तांग भागातील कोबान परिसरात कोसळले. या विमानाचे अवशेष मुस्तांग भागात आढळून आले आहेत. दरम्यान या अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषाचे काही फोटो आता समोर आले आहेत. रविवारी हे विमान अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर  रविवारी दुपारी चार वाजता हे विमान कोसळल्याचे जाहीर करण्यात आले. या अपघातग्रस्त विमानाच्या अवषेशाचे (aircraft wreckage) काही फोटो आज समोर आले आहेत. या फोटोनमधून विमानाचा किती भयानक पद्धतीने अपघात झाला असावा याची कल्पाना येते.

खराब हवामानमुळे बचाव कार्यात अडथळे

रविववारी हा विमान अपघात झाला होता. विमान दुर्घटनेनंतर खराब हवामानामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात अडथळे येत होते. मात्र नेपाळच्या लष्कराने अपघातस्थळ शोधले आहे. याबाबत बोलताना नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळचे सैन्य दल हवाई मार्गाने घटनास्थळी पोहोचले असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे अपघातस्थळापर्यंत पोहोचण्यास अनेक अडचणी आल्या. मात्र आता नेपाळचे लष्कर हे अपघात स्थळी पोहोचले आहेत. या विमानात एकूण 22 जण प्रवास करत होते अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

विमानात चार भारतीयांचा समावेश

दरम्यान रविवारी नेपाळमध्ये ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामध्ये एकूण 22 जण प्रवास करत होते. या विमानात चार भारतीयांचा देखील समावेश होता. मिळत असलेल्या माहितीनुसार अशोक कुमार त्रिपाठी, वैभवी बांदेकर धनुष आणि रितिका असे या विमानात असलेल्य भारतीय व्यक्तींची नावे आहेत. अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र ते वर्षातून एकदा आपली मुले धनुष आणि रितिका यांना घेऊन परदेशात पर्यटनाला जातात. यंदा ते नेपाळला गेले होते. याचादरम्यान हा अपघात झाला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.