1 तरुणी, 1 रात्र आणि 9 डेडबॉड्या… पापणी लवण्याच्या आत संपूर्ण शाही परिवाराचा The End; असं काय घडलं होतं नेपाळमध्ये?

नेपाळच्या इतिहासात याआधी अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. नेपाळचे राजघराणे देवांचे वंशज मानले जात होते, मात्र एका रात्रीत या राजघराण्यातील 9 जणांची हत्या करण्यात आली होती.

1 तरुणी, 1 रात्र आणि 9 डेडबॉड्या... पापणी लवण्याच्या आत संपूर्ण शाही परिवाराचा The End; असं काय घडलं होतं नेपाळमध्ये?
Nepal Royal Family
Updated on: Sep 10, 2025 | 10:57 PM

नेपाळमध्ये तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे सत्तापालट झाला आहे. त्यामुळे जगभरात सध्या नेपाळची चर्चा आहे. मात्र नेपाळच्या इतिहासात याआधी अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. नेपाळचे राजघराणे देवांचे वंशज मानले जात होते, मात्र 1 जून 2001 रोजी रात्री या कुटुंबात असे काही घडले ज्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. कारण या दिवशी या राजघराण्यातील 9 जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेपाळच्या राजघराण्याच्या राजवाड्यात 1 जून 2001 रोजी संध्याकाळी एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. दर शुक्रवारी कुटुंबातील सर्व सदस्य जेवणासाठी आणि गप्पा मारण्यासाठी एकत्र येत असायचे. 1 जून 2001 ला महाराज बिरेंद्र, राणी ऐश्वर्या, राजपुत्र दीपेंद्र, राजकुमार निराजन, राजकुमारी श्रुती तसेच राजघराण्यातील इतर सदस्य जेवण्यासाठी एकत्र आले होते.

सायंकाळी 8 च्या आसपास राजपुत्र दीपेंद्र शाह दारू आणि ड्रग्जच्या नशेत राजवाड्यात पोहोचले. दीपेंद्र आणि त्यांच्या पालकांमध्ये तणाव निर्माण झाला होता, कारण दीपेंद्रला एका साध्या कुटुंबातील देवयानी राणा या मुलीसोबत लग्न करायचे होते. मात्र घरातील लोकांचा त्याला विरोध होता. मात्र त्या रात्री जे घडलं त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता.

नेपाळच्या राजघराण्यातील हत्याकांड

1 जून 2001 च्या रात्री काय घडलं? कसं घडलं? कोणी आणि का केलं हे प्रश्न अनेकांना सतावत आहेत. याबाबत कोणाला काहीच माहिती नाही. याबाबत साक्षीदारांनी सांगितले की, दीपेंद्र सर्वांसोबत दारू पिला आणि आणि नंतर अचानक खोलीबाहेर गेला. थोड्या वेळानंतर तो बंदूक घेऊन परत आला. तो काहीही बोलला नाही, मात्र त्याने थेट गोळीबार सुरू केला. सर्वप्रथम महाराज बिरेंद्र यांना गोळी लागली. त्यानंतर दीपेंद्र यांनी राणी ऐश्वर्या आणि भाऊ निराजनवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे राजवाड्यातील लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या सर्व घटनेत राजघराण्यातील 9 सदस्यांचा मृत्यू झाला.

खरा आरोपी कोण?

या घटनेच्या तपासाला सुरुवात झाली. या घटनेतील खरा आरोपी कोण असा प्रश्न उपस्थित होत असताना राजकुमार दीपेंद्र यांनी हा गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. मात्र सदस्याची हत्या केल्यानंतर दीपेंद्र यांनी स्वतःवर गोळी झाडली होती, मात्र ते तीन दिवस जिवंत राहिले. या काळात नेपाळचा राजा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र 4 जूनला त्यांचा मृत्यू झाला. हे हत्याकांड देवयानी राणा या तरूणीमुळे घडल्याचे बोलले जात आहे.

3 दिवसांत 3 राजे

या हत्याकांडानंतर महाराज बिरेंद्र यांचा मुलगा युवराज दीपेंद्र यांना राजा बनवले. मात्र काही तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला. यानंतर 4 जून रोजी महाराजा बिरेंद्र यांचे धाकटे बंधू ज्ञानेंद्र बीर विक्रम शाह हे नेपाळचे राजे बनले. 1 जून ते 4 जून या 3 दिवसांमध्ये 3 राजे होते. मात्र कालांतराने नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली. 2008 मध्ये राजाचे सर्व अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. 2008 सारी माओवादी सरकार स्थापन झाले. त्यावेळी या हत्याकांडाची पुन्हा आणि सखोल चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र या चौकशीचा निकाल अद्याप लागलेला नाही.