‘या’ शहरात पुरामुळे प्रचंड कहर संपूर्ण घर गेले वाहून, हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा, पहा
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्याने संपूर्ण घर कसे वाहून नेले हे दिसून येते. हे भयानक दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल.

मंगळवारी दक्षिण न्यू मेक्सिकोमधील डोंगर भागातील गावात असलेल्या रुईडोसोमध्ये निसर्गाने असा कहर केला की सर्वजण हे दृश्य पाहून घाबरले आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे भयानक पूर आला. या पूरातील पाण्याचा जोर इतका जोरात होतात की यामध्ये काही क्षणार्धात एक मोठे अलिशान घर वाहून गेले. या भयानक दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, तर या व्हिडिओमध्ये पूराच्या पाण्याचा धडकी भरवणारा आवाज आणि पूराचे रौद्ररूप पाहून अनेकजण घाबरले आहेत.
वृत्तसंस्था एपी ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यू मेक्सिको होमलँड सिक्युरिटी अँड इमर्जन्सी मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे डॅनियल सिल्वा यांनी सांगितले आहे की, रुईडोसो परिसरातील आपत्कालीन पथकांनी 85 हून अधिक पूराच्या पाण्यातून अडकलेले तसेच पुराच्या पाण्यातून वाहणाऱ्या लोकांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये बरेच जण हे त्यांच्या वाहनांमध्ये आणि घरात अडकले होते.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्याने संपूर्ण घर कसे वाहून नेले हे दिसून येते. हे भयानक दृश्य पाहून तेथील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीपल मासिकाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, गेल्या मंगळवारी न्यू मेक्सिकोमधील एका गावात मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला, त्यानंतर तेथे आपत्तकालीन आणीबाणी जाहीर करावी लागली.
या भयानक व्हिडिओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पूर आला आहे. लोकांनी पीडितांबद्दल चिंता व्यक्त केली आणि बचाव पथकाच्या कामाचे कौतुकही केले.
View this post on Instagram
एका वापरकर्त्याने लिहिले, हे पाहून मन हेलावून गेले आहे. तेथील लोक सुखरूप राहावे यासाठी माझी प्रार्थना. तर हा भयानक व्हिडिओ पाहून दुसऱ्या वापरकर्त्याने पुराची तीव्रता पाहून कमेंट केली की, यावेळी सर्वांना लाईफ जॅकेट आणि कायाक द्यावेत, जेणेकरून ते संकटाच्या वेळी उपयोगी पडू शकतील.
त्याच वेळी, दुसऱ्या एका वापरकर्त्याने या नैसर्गिक आपत्तीचा संबंध हवामान बदलाशी जोडला आणि लिहिले की जोपर्यंत मानव या समस्येबद्दल गंभीर होत नाही तोपर्यंत निसर्गाचा रोष कायम राहील.
रुईडोसोमधील ही भयानक आपत्ती टेक्सासमधील विनाशकारी पुरानंतर काही दिवसांतच आली आहे, जिथे 100 हून अधिक लोकांचा बळी गेला आणि किमान 160 लोक बेपत्ता झाले आहेत. न्यू मेक्सिकोमध्येही नदीच्या पाण्याच्या पातळीत झालेली अचानक वाढ आणि पुराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
