AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेला मित्रांनीच दिला धक्का, डोनाल्ड ट्रम्प एकटे, थेट इराणसोबतच्या युद्धात..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध लवकरच संपण्याचे संकेत आहेत. मात्र, यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प युद्धात एकटे पडल्याचे बघायला मिळत आहे. एकही मित्र देश त्यांच्या मदतीला धावून आला नसल्याचे बघायला मिळत आहे. युद्धबंदीसाठी इराण तयार असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेला मित्रांनीच दिला धक्का, डोनाल्ड ट्रम्प एकटे, थेट इराणसोबतच्या युद्धात..
Donald Trump
| Updated on: Apr 15, 2026 | 8:56 AM
Share

इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला केला. यानंतर एकच मोठी खळबळ उडाली. ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी इराणकडून हल्ले करण्यात आली. इराणने अत्यंत घातकपणे या हल्ल्यांना उत्तर दिले. मात्र इराणकडून युद्ध सुरू होताच होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद झाल्याने अनेक देशांना नाकी नऊ आली. भारतात देखील एलपीजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनही स्थिती आहे. यादरम्यान भारताच्या मदतीला रशिया धावून आला. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने जाम लागला. पण इराणकडून दुसऱ्या मार्गाने भारतात कच्चे तेल पाठवण्यात आले. इराण आणि अमेरिकेच्या युद्धात जगातील अनेक देश होरपळताना दिसले. यादरम्यानच आता अमेरिकेकडून होर्मुज जवळ नाकेबंदी करण्यात आली. अमेरिका स्वत: ला महासत्ता म्हणून घेतो. मात्र, त्यांनाच या युद्धात मोठा धक्का बसला.

युद्ध कोणाचेही असो डोनाल्ड ट्रम्प युद्धात उडी मारतात. रशिया आणि युक्रेनच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. मात्र, अमेरिकेला ज्यावेळी त्यांच्या जवळच्या मित्रांची गरज होती, त्यावेळी एकही देश त्यांच्या मदतीला आला नाही. होर्मुज खाडीत त्यांनी काही देशांचे नाव घेत थेटपणे मदत मागितली. पण एकही देश त्यांच्या मदतीला आला नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बऱ्याचदा म्हटले की, मी नाटोवर नाराज आहे. नाटो देशही डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला आले नाहीत. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्टपणे सांगितले की, युरोपीय नौदलाची तैनाती अमेरिकेच्या आदेशाखाली नसेल, तर ती स्वतंत्रपणे कार्यरत राहील. ब्रिटन आणि फ्रान्स देखील अमेरिकेची साथ देताना दिसत नाहीत.

ब्रिटनलाही या युद्धात अमेरिकेने मदत मागितली होती. पण ब्रिटनकडूनही हातवर करण्यात आली. पाकिस्तानमधील अलीकडील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकेने होर्मुजच्या जवळ नाकेबंदी केली. ट्रम्प यांनी याला सर्व राष्ट्रांवर केलेली कृपा म्हटले. युरोपीय मित्र राष्ट्रांचे नियोजित स्वतंत्र अभियान अमेरिकेसाठी एक मोठा धक्का आहे. युद्धात डोनाल्ड ट्रम्प कुठे ना कुठे एकटे पडल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?