AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, आनंदाची बातमी, युद्ध जवळपास..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. युद्धबंदी करार लवकर व्हावेत, ही जगाची इच्छा आहे. यादरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत अत्यंत मोठे विधान केले. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामध्ये जग होरपळताना दिसले.

इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, आनंदाची बातमी, युद्ध जवळपास..
Donald Trump
| Updated on: Apr 15, 2026 | 7:54 AM
Share

अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीनंतर होर्मुज खाडीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार, नाकेबंदीनंतर इराणच्या एकाही बंदराहून जहाज निघाले नाही. हेच नाही तर अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणचे सहा जहाज आलेल्या मार्गाने परत गेले. यासोबतच अमेरिकेकडून मोठा दावा करण्यात आला. गेल्या 24 तासात होर्मुज खाडीतून 20 पेक्षा अधिक जहाज गेले. हा एक मोठा विजय नक्कीच म्हणावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून होर्मुज खाडी बंद बघायला मिळाली. अमेरिका इराण युद्धादरम्यान होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजाची ही संख्या जास्त म्हणावी लागेल. कोणत्याही अडथळ्याशिवाय होर्मुज खाडीतून तब्बल 20 जहाज गेले. हेच नाही तर एका मुलाखतीमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, युद्ध संपण्याच्या अत्यंत जवळ आहे. युद्ध जवळपास संपलेच आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही बॉम्ब धमक्याशिवाय किंवा एकही गोळी न चलता होर्मुज खाडीतून जगातील जहाज निघताना दिसत आहेत. कोणत्याही सैन्य कारवाईशिवाय. तज्ज्ञांच्या मते या युद्धात पहिल्यांदाच अमेरिकेची रणनीती काम करत आहे. कारण होर्मुज खाडीही खुली झाली असून अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर होर्मुज खाडी जहाजांना पार करता येत आहे. इराणला जहाज होर्मुज खाडीतून सोडण्याकरिता कोणत्याही धमकीशिवाय अमेरिकेने मजबूर केले.

हेच नाही तर अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर इराणच्या बंदरातून जहाज बाहेर पडू शकत नाहीत, ज्यामुळे मोठी कोंडी इराणची झाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवल्याशिवाय इराणकडे पर्याय उरला नाही. हेच नाही तर अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे आयात आणि निर्यात इराणची ठप्प झाली. याचा थेटपणे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. दुसरी युद्धबंदी करार बैठक होण्याचे संकेत आहेत.

अमेरिकेच्या काही अटी इराणकडून मान्य करण्यात आल्या. युद्धबंदी व्हावी आणि इराणकडून आपल्या मागण्या मान्य केल्या जाव्यात, याकरिता मोठी नाकेबंदी अमेरिकेने इराणची केली. युद्धबंदीच्या चर्चेदरम्यानच डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. काही मिनिटे ही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या युद्धाचा मोठा फटका भारतालाही बसताना दिसला. युद्धबंदी व्हावी, याकरिता भारताकडूनही प्रयत्न केली जात आहेत.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?