AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड मोठे संकट, अमेरिकेतल्या लोकांनीच…नो किंग्स आंदोलनाचा वणवा पेटला!

अमेरिकेत लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. तेथे नो किंग्स नावाचे आंदोलन केले जात आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर एका प्रकारे दुहेरी संकट आले आहे. या आंदोलनात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड मोठे संकट, अमेरिकेतल्या लोकांनीच...नो किंग्स आंदोलनाचा वणवा पेटला!
donald trumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2026 | 4:21 PM
Share

No Kings Protest : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात अमेरिकेनेही उडी घेतलेली आहे. अमेरिकेने आतापर्यंत इराणच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रं डागले आहेत. या हल्ल्यांमुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे इराणनेही आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलंय. या हल्ल्यांमुळे अमेरिकेची मोठी आर्थिक हानी झालेली आहे. एकीकडे अमेरिका या युद्धात गुंतलेली असतानाच या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे देशातच मोठे आव्हान निर्माण झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले असून तिथे ‘नो किंग्स’ आंदोलनाचे लोण देशभरात पसरले आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्यापुढे एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे देशांतर्गत निर्माण झालेला असंतोष अशी दोन आव्हानं उभी राहिल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेत नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. अमेरिकेतील सर्वच 50 राज्यांमध्ये शनिवारी (28 मार्च) लाखो लोक रस्त्यावर उतरले. तिथे नो किंग्स म्हणजेच कोणीही राजा नाही नावाचे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शनिवारी संपूर्ण अमेरिकेत वेगवेगळ्या रॅलींचे आयोजन करण्यात आले. याच आंदोलनाच्या माध्यमातून ट्रम्प यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नो किंग्स आंदोलनात याआधी दोन वेळा रॅलींचे आयोजन करण्यात आलेले आहे. अगोदर जून 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत साधारण 50 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अशाच रॅलीत 70 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यावेळच्या तिसऱ्या नो किंग्ज आंदोलनात 90 लाख लोक सहभागी झाले होते.

लोक ट्रम्प यांच्याविरोधात का भडकलेत?

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात तेथील लोक वेगवेगळ्या कारणांमुळे नाराज आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन पॉलिसीला तेथील लोक विरोध करत आहेत. तसेच इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धालाही तेथे काही लोकांकडून विरोध होतोय. तृतीयपंथीयांचे अधिकार कमी केले जात आहेत, अशी एक भावना तेथील लोकांत आहे. सोबतच श्रीमंत लोकांच्या वाढत्या प्रभावामुळेही अमेरिकन नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...