डॉक्टर प्रेमात ठार वेडा, तिचा मृतदेह कबरीतून काढला अन् सात वर्ष…वाचल्यास तुम्हीही हादरून जाल!
काही प्रेमकथा अशाही असतात ज्यांच्या बद्दल जाणून धक्का बसतो. अशीच एक प्रेमकहाणी जेव्हा सर्वांसमोर आली तेव्हा सगळेच हादरले होते. एका प्रियकराने मृत्यूनंतर आपल्या प्रेयसीला चक्क कबरीतून बाहेर काढलं आणि सात वर्ष तिच्यासोबत राहिला एवढंच नाही तर त्याने ज्या काही गोष्टी केल्या त्यापाहून पोलीससुद्धा हादरले होते.

आपण अनेकदा विचित्र प्रेमकथा ऐकतो. म्हणजे काही प्रेमकथा अशाही असतात ज्यांच्या बद्दल जाणून धक्का बसतो. अशीच एक प्रेमकहाणी जेव्हा जी सर्वांसमोर आली तेव्हा सगळेच हादरले होते. ही कथा प्रियकराने फसवल्याबद्दल किंवा हत्येबद्दल नाही. ही वेड्या प्रेमाची कहाणी आहे. जिथे एक प्रियकर प्रेमात इतका वेडा होता कि त्याने प्रेयसीच्या मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहासोबत अनेक वर्षे घालवली. तसेच त्याने पुढे जे काही केलं ते उघडकीस आल्यावर सगळे चाट पडले.
लहानपणी स्वप्नात एक काळ्या केसांची स्त्री पाहिली होती
ही कहाणी आहे 1931ची. पण ही लव्हस्टोरी आजही तेथील लोकांच्या लक्षात आहे. ही लव्हस्टोरी आहे 22 वर्षीय एलेना डी होयोस आणि कार्ल टैंज्लरची. एलेनाला टीबी झाल्याने तिला उपचारासाठी फ्लोरिडाच्या मरीन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे तिची भेट कार्ल टॅन्झलरशी झाली जो रेडिओलॉजिक टेक्नीशियन होता. त्याने स्वतःची ओळख काउंट कार्ल वॉन कोझेल अशी करून दिली. टँझलरने दावा केला होता की त्याने लहानपणी स्वप्नात एक काळ्या केसांची स्त्री पाहिली होती, जी त्याची खरी प्रेयसी होती. ती प्रेयसी तिला एलेनामध्ये दिसली.
प्रेयसिला वाचवण्यासाठी विचित्र उपचारांचा प्रयत्न केला
कार्ल टॅन्झलरने एलेनाला वाचवण्यासाठी विचित्र उपचारांचा प्रयत्न केला. त्याने तिला घरगुती टॉनिक, इलेक्ट्रिक उपकरणे आणि खोटी आश्वासने दिली. त्याने एलेनाला आपले प्रेम व्यक्त केले, परंतु एलेनाने कधीही ते स्वीकारले नाही. अखेर 25 ऑक्टोबर 1931 रोजी एलेनाचा मृत्यू झाला.
आत्म्याशी बोलू शकतो.
कार्लने एलेनाच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलला आणि स्वतःच्या खर्चाने तिची कबरही बांधली. ज्याच्या चाव्या फक्त त्याच्याकडेच होत्या. तो दररोज रात्री कबरला भेट देऊ लागला. तो तिथे गिफ्ट घेऊन जात असे, तिच्याशी बोलत असे आणि त्याने चक्क तिथे एक टेलिफोन बसवला होता. त्याने दावा केला की तो एलेनाच्या आत्म्याशी बोलू शकतो. 1933 मध्ये, एलेनाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी, कार्ल टँझलरने शांतपणे एलेनाचा मृतदेह बाहेर काढला आणि तो त्याच्या घरी आणला. पुढील सात वर्षे तो तिच्यासोबत एक माणूस म्हणून राहिला.
मेण आणि प्लास्टरने तिचा चेहरा बनवला
त्याने एलेनाचा मृतदेह एवढा जपला कि त्याने कोट हँगर्स आणि वायरने तिचे हाडे जोडून एक माणसाची प्रतिकृती तयार केली. त्याने मेण आणि प्लास्टरने तिचा चेहरा पुन्हा तयार केला. त्याने डोळ्यांत काचेचे डोळे लावले. त्याने एलेनाच्या खऱ्या केसांपासून विग बनवला. त्याने परफ्यूम आणि रसायनांनी तिच्या डेडबॉडीतून येणारा दुर्गंधही लपवला. त्याने एलेनाच्या मृतदेहाला कपडे घातले, दागिने घातले आणि ते स्वतःच्या पलंगावर ठेवले. अशा पद्धतीने तो या मृतदेहासोबत तब्बल 7 वर्ष राहिला. एवढंच नाही तर तो तिच्यासोबत रात्री झोपतही असे.
कबरीतून मृतदेह चोरल्याबद्दल अटक करण्यात आली
अखेर 1940 मध्ये, एलेनाच्या बहिणीला संशय आला आणि ती सत्य पडताळण्यासाठी कार्लच्या घरी गेली. तिथे तिला एलेनाचा विकृत पण चांगले कपडे घातलेला मृतदेह आढळला.त्यावेळी तिने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. कार्ल टँझलरला कबरीतून मृतदेह चोरल्याबद्दल अटक करण्यात आली होती, परंतु मर्यादांच्या कायद्यामुळे त्याच्यावर कोणतेही आरोप दाखल करण्यात आले नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या काळातील अमेरिकन जनता टँझलरला खरा प्रेमी मानत होती. वर्तमानपत्रांमध्ये त्याला “शोकांतिकेचा प्रेमी” म्हणून चित्रित केले जात असे.
मृत्यूच्या वेळीही त्याच्यासोबत एलेनासारखी दिसणारी एक मोठी बाहुली होती.
एलेनाचा मृतदेह एकदा अंत्यसंस्कार गृहात जनतेसमोर दाखवण्यात आला होता, जिथे तिला पाहण्यासाठी सुमारे 6000 लोक उपस्थित होते. नंतर, तिला एका गुप्त कबरीत पुरण्यात आले जेणेकरून कोणीही तिला पुन्हा बाहेर काढू नये. 1952 मध्ये कार्ल टँझलरचे निधन झाले. असे म्हटले जाते की त्याच्या मृत्यूच्या वेळीही त्याच्यासोबत एलेनासारखी दिसणारी एक मोठी बाहुली होती.
