AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात जुनं जिवंत शहर, जिथे 11000 वर्षांपासून कधीच विझली नाही चूल, कुठे आहे इतिहास जिवंत ठेवणारं हे शहर?

आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात जुन्या जिवंत शहराबद्दल सांगणार आहोत, जिथे गेल्या 11000 वर्षांपासून चुली जळतच आहेत. कुठे आहे हे शहर? जाणून घ्या सविस्तर

जगातील सर्वात जुनं जिवंत शहर, जिथे 11000 वर्षांपासून कधीच विझली नाही चूल, कुठे आहे इतिहास जिवंत ठेवणारं हे शहर?
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 26, 2026 | 11:10 AM
Share

इतिहासाच्या पुस्तकांत आपण मोठमोठ्या साम्राज्यांच्या उदय आणि पतनाच्या कथा वाचतो. मात्र काही ठिकाणे अशी असतात जी स्वतःच्या कुशीत हजारो वर्षांचा इतिहास जपून ठेवतात. अशाच ठिकाणांपैकी एक म्हणजे जेरिको. जगातील सर्वात जुने ‘जिवंत शहर’ म्हणून ओळखले जाणारे स्थान.

जेरिकोची कहाणी सुमारे 9000 इ.स.पूर्व काळापासून सुरू होते. म्हणजेच आजपासून तब्बल 11 हजार वर्षांपूर्वी येथे मानवाने स्थायिक होण्यास सुरुवात केली. जगातील इतर भागांत मानव अजून प्राथमिक जीवनशैली शिकत असताना, जेरिकोमध्ये मात्र वस्ती, शेती आणि समाजरचना विकसित होत होती. विशेष म्हणजे, तेव्हापासून आजपर्यंत येथे कधीच पूर्णतः ओसाडपणा आलेला नाही.

भूगोलाचा चमत्कार

आजचा जेरिको वेस्ट बँक या भागात, फिलिस्तीनमध्ये वसलेला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 850 फूट खाली असल्याने हे जगातील सर्वात खालच्या पातळीवर वसलेले शहर मानले जाते. चारही बाजूंनी उष्ण वाळवंट असूनही, येथे ‘एन एस-सुल्तान’ नावाचा झरा आहे. याच जलस्रोतामुळे जेरिको वाळवंटातील हिरवळीत रूपांतरित झाले.

पुरातत्त्वज्ञांच्या मते, जेरिको म्हणजे जणू ‘लेयर केक’सारखे आहे. येथे उत्खनन करताना इतिहासाच्या तब्बल 20 थर सापडतात. वरच्या थरात ओटोमन साम्राज्य, त्याखाली रोमन संस्कृतीचे अवशेष आणि सर्वात खालच्या थरात प्राचीन दगडी साधने आढळतात.

पहिली स्थिर मानवी वस्ती

जेरिकोमध्ये सर्वप्रथम स्थायिक झालेले लोक ‘नटूफियन’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी भटक्या जीवनशैलीचा त्याग करून एकाच ठिकाणी राहण्याची पद्धत सुरू केली. येथे मोठे धान्यसाठे, भिंती आणि गोलाकार घरे सापडली आहेत. हे मानवाच्या पहिल्या संघटित समाजाचे उदाहरण मानले जाते.

जेरिकोने अनेक युगांचा प्रवास पाहिला आहे. नवपाषाण युगापासून ते कांस्ययुगात येथे कनानी संस्कृती फुलली. पुढे सिकंदर महान यांच्या काळातही हे शहर महत्त्वाचे केंद्र होते. रोमन काळात येथे आलिशान व्हिला, बागा आणि जलव्यवस्था उभारली गेली. नंतर बायझंटाइन आणि इस्लामी काळात येथे चर्च आणि भव्य महाल उभारले गेले.

आजचा आधुनिक जेरिको

आज जेरिको एक आधुनिक शहर बनले आहे. येथे पर्यटक केबल कारमधून शहराचे दर्शन घेतात. हे युनेस्को मान्यताप्राप्त वारसा स्थळ आहे. जुन्या मातीच्या घरांऐवजी आता येथे आधुनिक इमारती, कॅफे आणि रिसॉर्ट्स दिसतात. ‘खजुरांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेरिकोमध्ये आजही शेती आणि व्यापार हे मुख्य व्यवसाय आहेत.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत