AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | 57 इस्लामिक देशांची बैठक, दुसऱ्याबाजूला सौदीने लेबनॉनमध्ये उचललं मोठ पाऊल

Israel-Hamas War | बुधवारी इस्लामिक देशांची संघटना IOC ने एक आपातकालीन बैठक केली. यात 57 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मागच्या 11 दिवसात 3,478 पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झालाय. येणाऱ्या दिवसात इस्रायल-हमास युद्धाचा भडका आणखी वाढू शकतो. सध्या इस्रायल आक्रमक आहे.

Israel-Hamas War | 57 इस्लामिक देशांची बैठक, दुसऱ्याबाजूला सौदीने लेबनॉनमध्ये उचललं मोठ पाऊल
Israel-Hamas war
| Updated on: Oct 19, 2023 | 5:06 PM
Share

जेरुसलेम : इस्रायल विरोधात मुस्लिम देश एकजूट झाले आहेत. गाझामधील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर मुस्लिम देशात इस्रायलबद्दल राग अधिक वाढला आहे. नुकतीच IOC ची 57 इस्लामिक देशांची बैठक झाली. यात पॅलेस्टाइनच्या मदतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी सौदी अरेबियाने लेबनॉनमध्ये मोठ पाऊल उचललं आहे. बेरुत येथील सौदी अरेबियाच्या दूतावासाने लेबनॉनमध्ये असलेल्या आपल्या सर्व नागरिकांना देश सोडण्यास सांगितलं आहे. लेबनॉनमधील सौदी अरेबियाचा दूतावास दक्षिण लेबनॉनमधील प्रत्येक स्थितीवर लक्ष ठेऊन आहे. इथली परिस्थिती खूप स्फोटक झाल्याच ,सौदीच्या दूतावासाने म्हटलय. सौदीच्या दूतावासाने लोकांची सुरक्षा ध्यानात घेऊन हा आदेश दिलाय.

दूतावासाने एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटलय की, “मंगळवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा सिटी हॉस्पिटलमधील शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला” गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की, मागच्या 11 दिवसात 3,478 पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला. 12000 पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत. हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहेच. पण आता लेबनॉन सीमेवर इस्रायल आणि हिजबोल्लाहमध्ये गोळीबार झालाय. रॉकेट डागण्यात आले आहेत. 57 इस्लामिक देशांच्या बैठकीत काय ठरलं?

बुधवारी इस्लामिक देशांची संघटना IOC ने एक आपातकालीन बैठक केली. यात 57 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सगळी परिस्थिती आणि नरसंहारासाठी इस्रायलला जबाबदार ठरवण्यात आलं. IOC कडून एक स्टेटमेंटही जारी करण्यात आलं. जेद्दामध्ये ही बैठक झाली. यात इस्रायलने हमासविरोधातील युद्ध तात्काळ थांबवाव असं आयओसीने म्हटलं. आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा, अशी सुद्धा मागणी करण्यात आली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.