China LY-1 : चीनने दाखवलं अमेरिकेला घाम फोडणारं LY-1 अस्त्र, गेम चेंजर ठरणाऱ्या या शस्त्रामध्ये असं काय खास?
China LY-1 : चीन अमेरिकेला उगाच नडत नाही. त्यांनी नेक्स्ट जेनेरेशन वॉरची आधीच तयारी करुन ठेवली आहे. चीनने विक्ट्री डे परेडच्या निमित्ताने आपली घातक अस्त्र जगाला दाखवली. यात LY-1 शस्त्राने लक्ष वेधून घेतलं. गेम चेंजर ठरणाऱ्या या शस्त्रामध्ये असं काय खास आहे? जाणून घ्या.

उद्या अमेरिकेसमोर टिकून रहायचं असेल, तर आपली सुद्धा तशीच तयारी असली पाहिजे याची चीनला आधी पासूनच कल्पना आहे. म्हणून आर्थिक विकास साधताना चीनने संरक्षणावर सुद्धा तितकच लक्ष दिलं. अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी आपली सुद्धा तशीच संरक्षण सिद्धता असली पाहिजे हे चीनने आधीच हेरलं होतं. त्या दृष्टीने त्यांनी स्वत:ची तयारी केली. काल विक्ट्री डे परेडच्या निमित्ताने चीनने त्यांची आधुनिक सैन्य सज्जता जगाला दाखवून दिली. चीनने या विक्ट्री डे परेडच्या निमित्ताने त्यांच्याकडच्या सर्व आधुनिक शस्त्रास्त्रांच प्रदर्शन केलं.
दुसऱ्या जागतिक महायुद्धात जपानी आक्रमणाविरुद्ध चीनने मिळवलेल्या विजयाला 80 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या विक्ट्री डे परेडच आयोजन करण्यात आलं होतं. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख यावेळी चीनमध्ये उपस्थित होते. चीनने यावेळी विक्ट्री डे परेडमध्ये दाखवलेल्या LY-1 लेजर शस्त्राची खास चर्चा आहे.
समुद्री युद्धात गेम चेंजर
आठ चाकी HZ-155 चिलखती ट्रकवर बसवलेलं हे लेझर अस्त्र शत्रुची शस्त्र आणि उपकरणाच्या ऑप्टिकल सेंसरना प्रभावीपणे निष्क्रीय करु शकतो. चिनी संरक्षण एक्सपर्टनुसार, LY-1 हे लेझर अस्त्र समुद्री युद्धात गेम आश्चर्यकारकरित्या बदलू शकतो.
डायरेक्ट एनर्जी वेपन
LY-1 लेजर बद्दल चीनचं सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्स हे एक डायरेक्ट एनर्जी वेपन असल्याच लिहिलं आहे. ही नौदल लेजर प्रणाली प्रामुख्याने ड्रोन आणि मिसाइल्सना नष्ट करण्यासाठी बनवण्यात आली आहे. या शस्त्राचा वापर समुद्रासोबत जमिनीवर सुद्धा होऊ शकतो.
Touted as the “world’s most powerful,” China’s LY-1 ship-based laser air defense system was displayed on an eight-wheeled truck, with no specs released. pic.twitter.com/WalkQffaA9
— Polymarket Intel (@PolymarketIntel) September 3, 2025
थेट टार्गेटला नष्ट करणं
हे शस्त्र शत्रुच्या ऑप्टिकल सेंसरना निष्क्रीय करु शकतो. कमी खर्चात अचूक कार्यक्रम करण्याची या वेपनची क्षमता आहे. चीनने LY-1 च्या वैशिष्टयाबद्दल गुप्तता बाळगली आहे. LY-1 उच्च शक्ती असलेल्या लेजर बीमद्वारे हायपरसोनिक मिसाइल सुद्धा रोखू शकतो. लेजरद्वारे संचालित होणाऱ्या शस्त्रास्त्रांचा जगभरात विकास होत आहे. ही दोन प्रकारची शस्त्र आहेत. एक डेजलर्स (Dazzlers) म्हणजे ऑप्टिकल सेंसरची क्षमता संपवून शत्रुला आंधळं करणं आणि दुसरं उच्च शक्तिशाली डिजाइनवाल्या लेजरने थेट टार्गेटला नष्ट करणं
