India-Pakistan War : भारताचा कुरापतीखोर पाकिस्तानला धडा, अमेरिका का म्हणाला Thank You India !

Operation Sindoor : अमेरिकेच्या प्रशासनातील माजी अधिकारी आणि मुत्सद्दी एली कोहेनिम यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानला ही सणसणीत चपराक मानण्यात येत आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी भारताचे आभार मानले आहे.

India-Pakistan War : भारताचा कुरापतीखोर पाकिस्तानला धडा, अमेरिका का म्हणाला Thank You India !
अमेरिकेन मत्सुद्दी, अधिकाऱ्यांनी मानले आभार
Image Credit source: गुगल
| Updated on: May 09, 2025 | 10:18 AM

America Says Thank You India : भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. आता तर पाकिस्तानच्या अर्थखात्याने चक्क जगभरात कटोरा फिरवला आहे. जगातील मित्र राष्ट्रांकडे त्यांनी आर्थिक मदत मागितली आहे. दुसरीकडे भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदला चांगलाच दणका दिला. दहशतवादी अब्दुल रऊफ अझहर या हल्ल्यात मारला गेला. तो दहशतवादी मसूद अझहर याचा भाऊ होता. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये तो मारल्या गेला. अब्दुल रऊफ अझहर हा जैशचा वरिष्ठ कमांडर होता. कंधार विमान अपहरण प्रकरणात त्याचा हात होता. त्यात मसूद अझहर याला सोडावे लागले होते. त्यानेच पुढे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता.

मसूदच्या भावाचा भारताने खात्मा केल्याने अमेरिकेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. अमेरिकेच्या प्रशासनातील माजी अधिकारी आणि मुत्सद्दी एली कोहेनिम यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानला ही सणसणीत चपराक मानण्यात येत आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी भारताचे आभार मानले आहे.

भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची पोस्ट काय?

अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि मुत्सद्दी एली कोहेनिम यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. त्यांनी भारताच्या पीएमओ कार्यालयाला ही पोस्ट टॅग केली आहे. त्यात दीर्घ काळापासून डेनियल पर्लसाठी आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत होतो. त्याला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे मारले होते. मी वैयक्तिक पातळीवर भारताचे आभार मानते. डॅनियल पर्लचे अखेरचे शब्द आम्हाला लक्षात आहे. तो म्हणाला होता की, माझे वडील यहुदी आहे. माझी आई यहुदी आहे. मी पण यहुदी आहे. आपले शब्द अखेरपर्यंत इतिहासात कायम राहतील. मसूद अझहरच्या भावाला भारताने टिपल्याने त्यांनी वैयक्तिक पातळीवर धन्यवाद म्हटले आहे. इस्त्रायलमधील प्रमुख वृत्तपत्र द येरूशलम पोस्ट याने हे वृत्त ठळकपणे अधोरेखित केले आहे.

पाकिस्तानी लष्कर तळावर हल्ले

पाकड्यांनी भारतीय सीमालगतच्या शहरांना टार्गेट केल्यानंतर आज भारताने सकाळपासूनच पाकिस्तानमधील अनेक शहरांवर हल्ले चढवले. नागरी भाग सोडून लष्करी तळावर भारताने हल्ले केला. मुझ्झफराबादमधील लष्करी तळ भारताने पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. या ड्रोन हल्ल्यात हा तळ बेचिराख झाला. तर 1971 नंतर पहिल्यांदाच भारताने कराचीतील बंदरावर ताबडतोब हल्ला चढवला आहे.