Operation Sindoor : पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये इमर्जन्सी सायरन, पळापळ, भारतीय सैन्याचा जोरदार प्रहार VIDEO
Operation Sindoor : पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक कृतीला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. काल पाकिस्तानने LOC वर काही खास अस्त्रांचा मारा केला. सीमेवरील 15 भारतीय नागरिक यामध्ये मारले गेले. आता भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला जशास तस प्रत्युत्तर दिलं जात आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्य पार हडबडून गेल्याच स्पष्ट दिसतय. LOC ला लागून असलेल्या गावांमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार, तोफगोळ्यांचा मारा सुरु आहे. पाकिस्तानच्या या नापाक कृतीला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. सैन्याच्या या कारवाईने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. सियालकोटच्या बाजवत सेक्टरमध्ये सीमेला लागून असलेल्या गावांमधून लोकांना बाहेर काढण्याच काम पाकिस्तानी सैन्याने सुरु केलं आहे. सियालकोटमध्ये नुसती पळापळ सुरु आहे. तिथे गोंधळाची स्थिती आहे. संपूर्ण शहरात इमर्जन्सीचे सायरन वाजवले आहेत. माईकवरुन सतत घोषणा केल्या जात आहेत. पाकिस्तानी सैन्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं अपील केलं आहे.
पाकिस्तानी LOC वर भारताच्या सामान्य नागरिकांना टार्गेट करत आहे. एलओसीला लागून असलेल्या गावांवर पाकिस्तानने तोपगोळे आणि मोर्टारचा मारा केला. यात कुपवाडाच्या करनाह आणि पुंछमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. यात लहान मुलं सुद्धा आहेत. अधिकाऱ्यांनुसार, 13 जणांना मृत्यू झाला. 57 जखमी झालेत. पाकिस्तान आपल्या नापाक, नीच हरकती सोडणार नाही. भारतीय सैन्याने तात्काळ या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून 7 आणि 8 मे च्या रात्री अंदाधुंद गोळीबार सुरु होता. भारतीय लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Sialkot in Pakistan right now. pic.twitter.com/yfig2ZaADQ
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 7, 2025
During the night of May 7-8, Pakistan Army posts resorted to unprovoked fire using small arms and artillery guns across the LoC in areas opposite Kupwara, Baramulla, Uri and Akhnoor areas in J&K. Indian Army responded proportionately: Indian Army pic.twitter.com/CAM2YXDXui
— ANI (@ANI) May 8, 2025
LOC वर भारत पूर्णपणे सज्ज
पाकिस्तानने भारताविरोधात मोठ्या प्रमाणात मनमानी आणि अंदाधुंद गोळीबार केला असं जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले. भारताने पाकिस्तानात एअर स्ट्राइक करताना निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं नाही. LOC वर कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे असं एलजी मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे.
