AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्जाधीशाचा मुलगा, बनला अलकायदाचा सरदार! कसा बनला जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी?

आज आम्ही तुम्हाला ओसामा बिन लादेनबद्दल सांगणार आहोत. ओसामा बिन लादेन हा जगातील सर्वात मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक होता. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. एका अब्जाधीशाचा मुलगा असतानाही लादेन कसा बनला दहशतवादी वाचा...

अब्जाधीशाचा मुलगा, बनला अलकायदाचा सरदार! कसा बनला जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी?
LadenImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 19, 2025 | 12:36 PM
Share

ओसामा बिन लादेन हे नाव सर्वांनाच ठावूक आहे. जगभरातील सर्वात क्रूर दहशतवादी म्हणून तो ओळखला जातो. 9/11 हल्लाच्या मागेदेखील ओसामा बिन लादेनचा हाथ होता. जिथे आपली कल्पना शक्ती संपते त्याच्या कितीतरी पटीने पुढे जाऊन ओसामा बिन लादेन धोकादायक असल्याचे म्हटले जाते. लादेन हा एका अब्जाधीशाचा मुलगा होता. तो जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कसा बनला? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया त्याविषयी…

ओसामा बिन लादेनची गुन्हेगारी कुंडली

लादेनचा जन्म 1957 मध्ये सौदी अरेबियातील जेद्दाह येथे यमनी बांधकाम व्यावसायिक मोहम्मद बिन लादेन यांच्या घरी झाला. मोहम्मद हे सौदी अरेबियाच्या तत्कालीन राजा फैजल यांचे जवळचे मित्र होते आणि त्यांचा बिन लादेन ग्रुप मक्का-मदिनातील मशिदींच्या नूतनीकरणाचे कंत्राट घेत असे. लादेन शिक्षण घेत असताना धार्मिक कट्टरपंथी लोकांच्या संपर्कात आला. येथूनच त्याचा दहशतवादाकडे झुकाव झाला आणि 1988 मध्ये त्याने अलकायदाची स्थापना केली. 1968 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर 13 व्या वर्षी लादेन आणि त्याच्या भावांना 300 दशलक्ष डॉलर्स (19 अब्ज रुपये) ची संपत्ती वारसाहक्काने मिळाली.

वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…

ओसामा बिन लादेन दहशतवादी कसा बनला?

लादेन धार्मिक राजकारण शिकवणारे मुस्लिम कट्टरपंथी शेख अब्दुल्लाह आजम यांच्या संपर्कात आला आणि त्यांच्या विचारांनी तो खूप प्रभावित झाला. आजम नेहमी आपल्या भाषणांमध्ये इस्लामिक राष्ट्रांना परदेशी हस्तक्षेपापासून मुक्त करण्याबद्दल बोलत असे आणि आपल्या विद्यार्थ्यांना धार्मिक कट्टरपंथाचे पालन करण्यावर जोर देत असे. आजम यांचा विश्वास होता की इस्लामने आपल्या मूळ तत्त्वांकडे परत जावे आणि याचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध जिहाद सुरू करावा.

अलकायदा काय आहे?

1980 च्या दशकात बंडखोर गट मुजाहिद्दीनने सोव्हिएत युनियन आणि अफगाण सैन्याविरुद्ध युद्ध सुरू केले. यापूर्वीच 1970 मध्ये लादेन अनेक कट्टरपंथी मुस्लिम गटांशी जोडला गेला होता. या युद्धात अफगाण लढवय्यांना मदत करण्यासाठी लादेन पाकिस्तानातील पेशावर येथे पोहोचला आणि त्यांना सौदी अरेबियाकडून आर्थिक मदतही मिळवून दिली. येथे लादेनने अरब-अफगाण आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी ‘द बेस’ नावाचा गट तयार केला, जो नंतर अलकायदा म्हणून ओळखला गेला.

अलकायदा जागतिक गट कसा बनला?

1989 मध्ये अफगाणिस्तानमधून सोव्हिएत युनियन माघारी गेल्यानंतर लादेन आपल्या कुटुंबाच्या बांधकाम कंपनीसाठी काम करण्याच्या हेतूने सौदी अरेबियाला परतला. आपल्या संघटनेला बळकट करण्यासाठी त्याने निधी गोळा करण्यास सुरुवात केली आणि अलकायदा एक जागतिक गट बनला. याचे मुख्य कार्यालय अफगाणिस्तानात होते, तर त्याचे सदस्य 35 ते 60 देशांमध्ये पसरले होते. बिन लादेन ग्रुपचे कर्मचारी डॅनियल ओमान यांच्या मते, लादेनला त्याच्या भावांनी आणि सौदी अरेबिया राजघराण्याने बहिष्कृत केले होते.

ओसामा बिन लादेन मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कसा बनला?

-सुदानमध्ये लादेनने आपल्या संघटनेला मजबूत करण्यासाठी परदेशी निधी घेतले आणि दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे सुरू केली.

-लादेनचा पहिला उद्देश मुस्लिम देशांमधून अमेरिकन लोकांना हुसकावून लावणे हा होता.

-1993 मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर मोठा हल्ला केला. सेंटरजवळील ट्रक बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण जखमी झाले.

-अमेरिकन लोकांना लक्ष्य करत 1995 मध्ये अलकायदाने नैरोबी आणि तंजानियातील दार-ए-सलाम येथील अमेरिकन दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट घडवले, ज्यामध्ये 224 लोकांचा मृत्यू झाला.

-1996 मध्ये अमेरिकन दबावामुळे सुदानने लादेनला देशातून हाकलून दिले. तो आपल्या 10 मुलांना आणि तीन पत्नींसह अफगाणिस्तानात पोहोचला. येथे त्याने अमेरिकन सैन्याविरुद्ध जिहाद जाहीर केला.

-1998 मध्ये अमेरिकेच्या एका न्यायालयाने दूतावासावरील हल्ल्याच्या आरोपात लादेनला दोषी ठरवले. त्याच्या डोक्यावर 50 लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले.

ओसामा बिन लादेनचा मृत्यू कसा झाला?

2001 मध्ये अलकायदाने 11 सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्स आणि पेंटागनवर हल्ला केला, ज्यामध्ये 3,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर अमेरिकन सरकारने मुख्य दहशतवादी म्हणून लादेनच्या नावाची घोषणा केली आणि त्याचा शोध घेण्यासाठी अफगाणिस्तानात अनेक मोठी ऑपरेशन्स केली. अखेरीस 2011 मध्ये अमेरिकेचे गुप्त ऑपरेशन यशस्वी झाले आणि पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात आले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.