Chinese rocket: कोणत्याही क्षणी चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट पृथ्वीवर कोसळणार

आता हे रॉकेट समुद्रात कोसळणार की मानवी वस्तीत, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. | Chinese rocket

Chinese rocket:  कोणत्याही क्षणी चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट पृथ्वीवर कोसळणार
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 8:29 AM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचे अनियंत्रित रॉकेट (Chinese rocket ) पृथ्वीवर कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. आगामी काही तास हे अत्यंत महत्त्वाचे असतील. हे रॉकेट न्यूझीलंडमध्ये कोसळेल, असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला होता. (Out of control Chinese rocket expected to collide with Earth within hours)

आता हे रॉकेट समुद्रात कोसळणार की मानवी वस्तीत, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हे रॉकेट पृथ्वीवर कोसळेल, असा अंदाज होता. मात्र, अजूनपर्यंत या रॉकेटचा कोणताही पत्ता लागलेला नाही.

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर बहुतांश अंतराळ कचरा हवेतच जळून जातो. क्वचितच असे विशाल तुकडे पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकले आहेत. गेल्यावर्षी अशाचप्रकारे अनियंत्रित स्पेस डेब्रीज लॉस अँजेलिस आणि न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या आकाशातून प्रवास करत अटलांटिक महासागरात पडल्या होते. मात्र, त्यामुळे विशेष नुकसान झाले नव्हते.

अमेरिका ‘ते’ अनियंत्रित रॉकेट ‘उडवणार’ नाही

दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने आता नियंत्रणबाह्य चिनी रॉकेट उडवण्याची (शूट डाऊन) योजना नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी माहिती दिली. हे रॉकेट समुद्र किंवा तत्सम मोकळ्या जागेवर कोसळून कोणालाही हानी पोहोचणार नाही, अशी आशा ऑस्टिन यांनी व्यक्त केली.

रॉकेटचे वजन तब्बल 21 टन

मिळालेल्या माहितीनुसार अंतराळात सध्या रॉकेटचा मुख्य भाग फिरतो आहे. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब आहे. याचे वजन तब्बल 21 टन आहे.

रॉकेटचा वेग 7 किमी प्रतिसेकंद

पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) असे आहे. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत आहे. म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीपासून 170 ते 372 किलोमीटर उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रॉकेटची रुंदी 16 फूट असून चीनने त्याला 28 एप्रिल रोजी अंतराळात सोडले होते. त्यावेळी जल्लोष करतानाचा व्हिडीओ चीनच्या अधिकाऱ्यांनी शेअर केला होता.

संबंधित बातम्या :

चीनचं रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, ‘या’ देशांवर कधीही कोसळण्याची शक्यता, पृथ्वी संकटात ?

(Out of control Chinese rocket expected to collide with Earth within hours)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.