
ब्रिटनमधील पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी भारतीयांचा गळा कापण्याचे हातवारे केल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. पाकिस्तानचा हा जिहादी नकाब पुन्हा एकदा अवघ्या जगासमोर आला आहे. या व्हिडिओवर अनेकांना बालिशबुद्धी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर कुणी पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे, जाणून घेऊया.पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जगातून टीका होऊनही पाकिस्तान सुधारत नाही. पाकिस्तानातील मूलतत्त्ववादी मानसिकता इतकी बनली आहे की, आता परदेशातील दूतावासांमध्ये बसलेले त्यांचे अधिकारी जिहादींसारखे वागू लागले आहेत.
लंडनमधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने भारतीय अमेरिकनांचा गळा कापण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानी लष्करी अधिकारी उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर उभा राहून हे करत होता.
कर्नल तैमूर राहत असे या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचे नाव असून तो ब्रिटनमधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात लष्करी आणि हवाई सल्लागार आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय समुदायाचे सदस्य पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर जमले होते. यावेळी पाकिस्तानी लष्करी अधिकारी तैमूर उच्चायुक्तालयाच्या इमारतीच्या बाल्कनीत उभा असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या हातात भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन यांचा फोटो होता. तो गळा चिरण्याची धमकी देताना दिसला.
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कर्नल तैमूर आंदोलकांकडे बोट दाखवतो आणि नंतर गळा कापण्याच्या शैलीत गळ्याजवळ हात फिरवतो. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी भारतीय समुदायाच्या सदस्यांकडे पाहतो आणि हाताच्या इशाऱ्याने त्यांना अशाच अवस्थेत नेण्याची (त्यांचा गळा कापून) धमकी देतो.
#BREAKING: Pakistan Army Defence Attache in London gestures towards Indian protestors to slit their throat publicly. This is Colonel Taimur Rahat of Pakistan Army, Air and Army Attache at Pakistan’s Mission in UK. No difference between a thug illiterate terrorist at this coward. pic.twitter.com/eZdRxqBN4q
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 25, 2025
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ लंडनमध्ये भारतीय समुदायाच्या ५०० हून अधिक लोकांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली. ज्यू समाजातील लोकही सहभागी झाले होते. आंदोलकांनी भारताचे झेंडे फडकावले आणि या हल्ल्याचा निषेध करणारे फलक हातात घेतले. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. आंदोलकांनी न्याय आणि उत्तरदायित्वाची मागणी करत घोषणाबाजी केली.
हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याच्या आठवणी
आंदोलनाच्या आयोजकांपैकी एकाने सांगितले की, “ही चिथावणीखोर बाब आहे. पाकिस्तान दहशतवादाचा निषेध करू शकत नसेल तर ते सहभागी आहेत. आम्ही भारताला पाठिंबा देतो कारण आम्ही त्याच शत्रू ‘इस्लामिक मूलतत्त्ववादा’चा सामना करत आहोत, असे भारतीय-ज्यू आंदोलकाने एएनआयला सांगितले. पहलगाममध्ये घडलेल्या घटनेमुळे हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची आठवण झाली.