AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PoKमध्ये आणीबाणी, सुट्ट्या रद्द अन् आरोग्य कर्मचारी अलर्ट मोडवर…, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घबराट

pahalgam terror attack: सर्व रुग्णालये आणि आरोग्य युनिटमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित ड्युटी पॉइंट्सवर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही कर्मचारी सुट्टी घेणार नाही किंवा बदली होणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

PoKमध्ये आणीबाणी, सुट्ट्या रद्द अन् आरोग्य कर्मचारी अलर्ट मोडवर..., पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घबराट
pahalgam terror attack
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 27, 2025 | 1:26 PM
Share

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानने भारताकडून हल्ला होण्याची प्रचंड धास्ती घेतली आहे. यामुळे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये प्रशासनाकडून अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. पाकिस्तानने पीओकेमध्ये आणीबाणी घोषित करत सर्वांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवले आहे. सरकारी वाहनांचा खासगी वापर करण्यास बंदी आणली आहे.

२५ एप्रिल रोजी झेलम व्हॅली आरोग्य संचालनालयाने आदेश काढले आहे. त्या आदेशात “आणीबाणीची परिस्थिती” असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे सर्व रुग्णालये आणि आरोग्य युनिटमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित ड्युटी पॉइंट्सवर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही कर्मचारी सुट्टी घेणार नाही किंवा बदली होणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

भारतीय सुरक्षा संस्थांनी पाकिस्तानकडून पीओकेमध्ये काढण्यात आलेल्या आणीबाणीचा आदेश गंभीरतेने घेतला आहे. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) असामान्य लष्करी किंवा दहशतवादी कारवाया वाढू शकतात, अशी शक्यता आहे.

काय आहे पीओकेबद्दल आदेश?

देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन सर्व आरोग्य केंद्रांच्या प्रभारींना सूचना दिल्या आहेत. जिल्हा मुख्यालय रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय केंद्रांमध्ये कोणत्याही अनुचित घटनेला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे सांगितले आहे. डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकांना सदैव तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आरोग्य केंद्रांमधील सर्व वैद्यकीय अधिकारी अन् पॅरामेडिकल कर्मचारी जे रजेवर गेले आहेत त्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत, असे पीओके प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानने भारताकडून व्यापार थांबवल्यानंतर औषधींचा साठ करण्यास सुरुवात केली आहे. आप्तकालीन परिस्थिती समजून औषधांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे, जिओ न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे. पाकिस्तानच्या ड्रग रेग्यूलेटरी अथॉरिटीकडून याला दुजोरा मिळाला आहे.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण