PAK AFG War : …तर आम्ही पाकिस्तानचा नकाशा बदलू, तालिबानची असीम मुनीरला सर्वात मोठी धमकी

War : अफगाणिस्तानचे गृहमंत्री खलिफा सिराजुद्दीन हक्कानी यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. आम्ही पाकिस्तानचा नकाशा बदलू असा इशारा हक्कानी यांनी दिला आहे.

PAK AFG War : ...तर आम्ही पाकिस्तानचा नकाशा बदलू, तालिबानची असीम मुनीरला सर्वात मोठी धमकी
Pak AFG War
Image Credit source: Google
| Updated on: Feb 27, 2026 | 10:45 PM

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत. अशातच आता इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तानचे गृहमंत्री खलिफा सिराजुद्दीन हक्कानी यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. शुक्रवारच्या नमाजानंतरच्या प्रवचनात हक्कानी यांनी, अफगाण जनता एकत्र येऊन पाकिस्तानविरुद्ध लढण्यास तयार आहे.’ यावेळी त्यांनी पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांना इतिहासातून धडा घेण्याचा सल्लाही दिला. हक्कानी यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

… तर आम्ही पाकिस्तानचा नकाशा बदलू

टोलो न्यूजने दिलेल्या महितीनुसार, सिराजुद्दीन हक्कानी यांनी पाकिस्तानचा नकाशा बदलण्याची धमकी दिली. ते म्हणाले, ‘जर आम्ही नाटोविरुद्धच्या युद्धाप्रमाणे एका दिवसासाठीही पाकिस्तानविरुद्ध युद्ध केले तर आम्ही पाकिस्तानचा नकाशा बदलू.’ पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीर यांना इशारा देताना हक्कानी म्हणाले की, जर मुनीर यांनी भूतकाळातील चुकांमधून धडा घेतला नाही तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. असीम मुनीर यांनी त्याच्या पूर्वजांना विचारावे आणि हे लक्षात ठेवावे की, ‘अफगाणांनी संघर्ष आणि बलिदानाद्वारे ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलेले आहे.’

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष आता तीव्र झाला आहे. काल रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काही शहरांवर हल्ले केले. त्यानंतर तालिबानने प्रत्युत्तर देत अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ले केले. दोन्ही देश वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्यांचा दावा करत आहेत. त्यामुळे आता आगामी काळात दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा तालिबानवर आरोप

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, अफगाणिस्तानातून नाटो सैन्याच्या माघारीनंतर शांततेची आशा आहे. तालिबानने अफगाण लोकांच्या विकासावर आणि प्रादेशिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करावे. पाकिस्तानने याआधी अफगाण निर्वासितांना आश्रय देऊन सकारात्मक भूमिका बजावली होती, मात्र आता संयम संपला आहे, त्यामुळे युद्ध सुरू झाले आहे. दरम्यान, आता जगातील अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच काही देशांनी चर्चेसाठी मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्यामुळे आता हे युद्ध नेमकं कधी थांबणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us