AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Hindu Girl : पाकिस्तानात 15 वर्षाच्या हिंदू मुलीसोबत भयानक घडलं, थेट घरात घुसले आणि…

Pakistan Hindu Girl : सिंध प्रांत हा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टे यांचा बालेकिल्ला आहे. पाकिस्तानात जवळपास 44 लाख हिंदू राहतात. बहुतांश हिंदू सिंध प्रांतात राहतात. पाकिस्तान मानवधिकारानुसार त्यांच्या देशात हिंदुंची स्थिती मजूरांसारखी आहे.

Pakistan Hindu Girl : पाकिस्तानात 15 वर्षाच्या हिंदू मुलीसोबत भयानक घडलं, थेट घरात घुसले आणि...
Pakistan Hindu Girl
| Updated on: Jul 03, 2025 | 3:27 PM
Share

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात बदीन जिल्ह्यात मतलीमध्ये एका 15 वर्षीय हिंदू मुलीच अपहरण करण्यात आलं. बंदुकीच्या धाकावर 4 मुलांनी हिंदू मुलीच अपहरण केलं. त्यानंतर तिच्यासोबत लग्न केलं. ही घटना समोर येताच संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली आहे. मानवधिकार आयोगाने संपूर्ण प्रकरणात रिपोर्ट सोपवलाय. सिंध प्रांत हा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टे यांचा बालेकिल्ला आहे. डॉन वर्तमानपत्रानुसार, मतली गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीने मानवधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे. आधी चार युवक त्याच्या घरात घुसले आणि 15 वर्षीच भाचीला उचलून घेऊन गेले.

पीडित व्यक्तीनुसार, काहीवेळाने भाचीसोबत लग्न केल्याची बातमी समोर आली. या व्यक्तीने प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या भागात बंदुकीच्या धाकावर मुलीच अपहरण केलं, तिथे लोकांमध्ये दहशत आहे. स्थानिक पोलिसांनुसार आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. मंसूर डार आणि मकसूद डार ही दोन आरोपींची नावं आहेत. अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाही.

पाकिस्तानात अशा गुन्ह्यासाठी शिक्षा काय?

मानवाधिकार आयोगाने पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 365-बी, 364-ए आणि 506 अंतर्गत कारवाई करण्यास सांगितलं आहे. आयोगाने तात्काळ मुलीला शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानात अल्पवयीन मुलींशी लग्न करणं हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी जामीन मिळत नाही. पाकिस्तान सरकारने यासाठी कठोर कायदा बनवला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्याला सात वर्ष कारवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

पाकिस्तानात किती लाख हिंदू?

वर्ष 2023 मध्ये कराचीत सुद्धा असच एक प्रकरण समोर आलेलं. त्यावेळी हिंदू संघटना रसत्यावर उतरलेल्या. त्यानंतर पाकिस्तान सरकारला पावलं उचलावी लागलेली. पोलिसांनी मुलीला शोधून काढून शेल्टर होममध्ये पाठवलेलं. पाकिस्तानात जवळपास 44 लाख हिंदू राहतात. बहुतांश हिंदू सिंध प्रांतात राहतात. पाकिस्तान मानवधिकारानुसार त्यांच्या देशात हिंदुंची स्थिती मजूरांसारखी आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.