AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : भारताने ज्या पाच मोठ्या दहशतवाद्यांना ढगात पाठवलं, पाकिस्तानातून आली त्यांची लिस्ट

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने ज्या पाच मोठ्या दहशतवाद्यांना ढगात पाठवलं. त्यांची लिस्ट आली आहे. महत्त्वाच म्हणजे कुठल्या-कुठल्या दहशतवाद्याच्या अंत्यविधीला पाकिस्तानी लष्कर आणि तिथले नेते, मंत्री उपस्थित होते, त्याची डिटेल माहिती.

Operation Sindoor : भारताने ज्या पाच मोठ्या दहशतवाद्यांना ढगात पाठवलं, पाकिस्तानातून आली त्यांची लिस्ट
masood azhar hafiz saeed
| Updated on: May 10, 2025 | 2:13 PM
Share
भारताने 7 मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरु केलं. अजूनही हे ऑपरेशन सुरु आहे. भारताच्या सैन्य दलांनी आपली वायू शक्ती दाखवून दिली आहे. पाकिस्तानातील 8 एअर बेस उडवल्याची माहिती आहे. भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मूळात हे ऑपरेशन 7 मे रोजी सुरु झालं. त्यावेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ एअर स्ट्राइकमध्ये उद्धवस्त केले. लश्कर, जैश आणि हिजबुल मुजाहिदीन यांचे दहशतवादाचे अड्डे उडवण्यात आले. या कारवाईत किती दहशतवादी मारले गेले, त्यांचे वेगवेगळे आकडे सांगितले जातात. पण आता या कारवाईत जे पाच मोठे दहशतवादी मारले गेले, त्यांची नाव समोर आली आहेत.
1 मुदस्सर खादियन खास ऊर्फ मुदस्सर, अबू जुंदाल
दहशतवादी संघटना – लष्कर-ए-तैयबा
मुरीदकेमधील मर्कझ तैयबाचा प्रमुख
पाकिस्तान लष्कराकडून मानवंदना देऊन दफन विधी
पाकिस्तान लष्कर प्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण.
जमाच उद दावाचा जागतिक दहशतवादी हाफीज अब्दुल रौफ यांच्या नेतृत्वाखाली सरकारी शाळेत दफनविधी पार पडला.
पाकिस्तान लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी प्रार्थना सभेला उपस्थित

2 हाफीज मुहम्मद जमील 
जैश-ए-मोहम्मद
मौलाना मसूद अजहरचा मेहुणा
बहावलपूरमधील मर्कझ सुभान अल्लाहचा प्रमुख
जैश-ए-मोहम्मदसाठी निधी गोळा करायचा. युवकांना कट्टरपथांची शिकवण द्यायचा.

3 मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्तादजी, उर्फ घोसी साहब
जैश-ए-मोहम्मद
मौलाना मसूद अजहरचा मेहुणा
जैशच्या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र चालवण्याच प्रशिक्षण द्यायचा.
जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभागी
IC-814 अपहरण प्रकरणात वाँटेड

4.  खालिद उर्फ अबू आकाशा
लष्कर-ए-तैयबा
जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभागी
अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्र तस्करीत सहभाग
फैसलाबादमध्ये अंत्यविधी. पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित

5 मोहम्मद हसन खान 
जैश-ए-मोहम्मद
मुफ्ती अजगर खान काश्मिरीचा मुलगा. POK मधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्यात महत्त्वाची भूमिका.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.