
India Vs Pakistan : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांत कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. अजूनही भारत-पाकिस्तान यांच्यातील व्यापार सुरू झालेला नाही. दरम्यान, भारताने हल्ले केल्यानंतर पाकिस्ताननेदेखील भारतावर हवाई हल्ले केले होते. याच हल्ल्यांचा आधार घेत आम्ही भारताला नमवलं असा दावा पाकिस्तानी लष्कराकडून केला जातो. सध्या पाकिस्तानी लष्करात मोठ्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना अनेक बडे दावे केले आहेत. विशेष म्हणजे भारतीय लष्कराचे राजकीयीकरण झाले आहे, असा मोठा दावा या अधिकाऱ्याने केला आहे.
या आधिकाऱ्याचे नाव जनरल साहीर शमशाद मिर्झा असे आहे. या अधिकाऱ्याला एका कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली. हीच संधी साधत या आधिकाऱ्याने भारतावर गंभीर आहे. भारतीय लष्करात राजकरणाचा आणि भारतीय राजकारणात लष्कराचा मोठा हस्तक्षेप आहे, असा दावा या पाकिस्तानी अधिकाऱ्याने केला आहे. आमचा पाकिस्तान देश संवादाला प्राधान्य देतो. संघर्षाऐवजी शांततेला महत्त्व देतो, असा पोकळ दावा या अधिकाऱ्याने केला.
सोबतच, या अधिकाऱ्याने काश्मीरच्या मुद्द्यावरही भाष्य केले. आम्ही भारतासोबत चर्चा करायला तयार आहोत. भारतासोबत असलेल्या सर्व वादावर चर्चा करायची आमची तयारी आहे. पाकिस्तानला भारतासोबतचे संबंध पूर्ववत हवे आहेत. शांतपूर्ण सहअस्तित्वाला आम्ही प्राधान्य देतो. पण भारताकडूनही अशाच प्रकारची इच्छा व्यक्त होणे गरजेचे आहे, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.
Ulta chor kotwal ko daante…..😝
Pakistan’s top Gen Sahir Shamshad Mirza tried lecturing India again…
1. “Indian military is politicised and Indian polity is militarised.”
Funny. In Pakistan, generals pick PMs like class monitors and rewrite constitutions between tea breaks.… pic.twitter.com/6umQpBs5vv— OsintTV 📺 (@OsintTV) October 21, 2025
काश्मीरचा मुद्दा हा फक्त भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील मुद्दा आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही तृतीय शक्तीचा हस्तक्षेप मान्य नाही, अशी भारताची भूमिका आहे. पण या अधिकाऱ्याने मात्र भारतासोबतचा वाद मिटवण्यासाठी तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप गरजेचा आहे, अशी आमची भूमिका असल्याचे या आधिकाऱ्याने सांगितले. सोबतच अशा प्रकारचा हस्तक्षेप करण्यास जगातील कोणताही देश तयार असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असेही मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले