भारताने जे नाकारलं, तेच पाकिस्ताननं केलं, पाकचा मोठा निर्णय; थेट आर्मीलाच…
भारताने जी गोष्ट नाकारली, ती करण्यात पाकिस्तान आघाडीवर असल्याचं दिसतं. भारताने वुईचॅटवर बंदी घातलेली आहे. तर पाकिस्तानने आता त्यांच्या आर्मीला व्हॉटसअप न वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्याबदल्यात वुईचॅट वापरण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानी सैन्याने आपल्या सैन्य अधिकारी आणि जवानांना व्हॉटसअपचा वापर करण्यास बंदी घातली आहे. व्हॉटसअप हा अमेरिकेच्या मेटा कंपनीचा प्लॅटफॉर्म आहे. पाकिस्तानच्या सैन्य आणि जवानांना आता व्हॉटसअपऐवजी WeChat या चीनी अॅपचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान आणि चीनच्या दरम्यान संरक्षण आणि राजनैतिक भागीदारी वाढत असताना हा निर्णय आला आहे. विशेष म्हणजे भारतात WeChatच्या वापराला बंदी आहे. मात्र, पाकिस्तानने याच अॅपचा वापर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याने एक इंटर्नल ऑर्डर काढली आहे. सर्व सैन्याधिकारी, जवान आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हळूहळू व्हॉटसअपचा वापर बंद करण्याचा सल्ला दिला आहे. सैन्याबाबतच्या चर्चेसाठी अधिकृतपणे WeChatचा वापर करा, असे आदेश या इंटर्नल आदेशात म्हटलं आहे. भारताने यापूर्वीच चीनी अॅप बंद केले आहेत. त्यामुळे भारतात WeChat उपलब्ध नाहीये.
सुपर अॅप
पाकिस्तानी सैन्याच्या मतानुसार, पश्चिमेकडील देशाच्या मेसेंजिग प्लॅटफॉर्मवर देखरेख, डेटा लीक आणि बातचीत इंटरसेप्ट होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळेच सैन्याला आता चीनी WeChat या अॅपचा वापर करायचा आहे. दरम्यान, WeChat चीनमधील सर्वात मोठा मेसेजिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे केवळ चॅटिंग अॅपच नाहीये, तर यामध्यमातून व्हिडिओ कॉल, फाईल शेअरिंग, पेमेंट आणि इतर डीजिटल सेवाही मिळतात. अशा प्रकारच्या अॅपना सुपर अॅपही म्हटलं जातं. चीनचे करोडो लोग या अॅपचा वापर करतात. तिथला हा सर्वात पॉप्युलर अॅप आहे.
संबंध वृद्धिंगत होतील
पाकिस्तानी सैन्याने WeChatचा वापर केल्यास पाकिस्तान आणि चीनी सैन्यांदरम्यान डीजिटल सिस्टिम एक सारखी करण्यास मदत होणार आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान सैन्याच्या माहितीची देवाणघेवाण करणं, संयुक्त ऑपरेशनवेळी संवाद साधणं आणि पूर्वी पेक्षाही आता इंटिलिजन्स कोऑर्डिनेशन सोपं होणार आहे, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आणि चीन दरम्यान संरक्षण संबंध अधिक मजबूत होत आहेत. पूर्वी दोन्ही देशांचे संबंध केवळ शस्त्र खरेदीपर्यंतच मर्यादित होते. पाकिस्तानने चीनकडून लढाऊ विमान, युद्धपोत आणि एअर डिफेन्सची खरेदी केली आहे. पण आता ही भागीदारी केवळ शस्त्र खरेदीपर्यंत मर्यादित राहिलेली नाही.
रिपोर्टनुसार, दोन्ही देश सायबर सुरक्षा मजबूत करण्यावर आणि सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टिम विकसित करण्यावर भर देत आहेत. तसेच संयुक्त कम्युनिकेशन प्रोटोकॉल तयार करण्यावर आणि इंटेलिजन्स नेटवर्क मजबूत करण्यावरही दोन्ही देश काम करत आहेत. वुईचॅटबाबतचा निर्णय हा त्याचाच एक भाग असल्याचं मानलं जात आहे.