Pakistan-Afganistan War : दगाबाज पाकिस्तानने सीजफायरच्या नावाखाली अफगाणिस्तानच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्यावर विश्वास ठेवला ही मोठी चूक
Pakistan-Afganistan War : पाकिस्तान हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही. हे पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. दगाबाज पाकिस्तानने सीजफायरच्या नावाखाली अफगाणिस्तानच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा पाकिस्तानने असच केलं होतं.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये 48 तासांच्या सीजफायरसाठी एकमत झालं होतं. त्यानंतर दोन्ही बाजुंनी हल्ले थांबले होते. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने या सीजफायरच उल्लंघन करत अफगाणिस्तानवर पुन्हा एअर स्ट्राइक केला. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील अरगुन आणि बरमल जिल्ह्यात हल्ले केले. डूरंड लाइनला लागून असलेल्या भागात हे हल्ले केले असं तालिबानकडून सांगण्यात आलं. पाकिस्तानने सीजफायरच उल्लंघन करत हा एअर स्ट्राइक केला असा तालिबानचा आरोप आहे. या हल्ल्यात 10 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा काबूलने केला आहे.
अफगाणिस्तानातील लोकस टोलोन्यूजने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील अरगुन आणि बरमल जिल्ह्यात अनेक घरांवर हल्ले झाल्याच स्थानिक बातम्यांमध्ये म्हटलं आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात सीमेला लागून असलेल्या या दोन भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता प्रत्युत्तराची कारवाई म्हणून तालिबानकडून पाकिस्तानवर हल्ले होऊ शकतात. त्यामुळे अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती अधिक चिघळू शकते.
आज पाकिस्तानची लाज निघू शकते
एका मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळ कतरची राजधानी दोहा येथे पोहोचलं होतं, त्या दिवशी हे हल्ले झाले. अफगाणिस्तानच प्रतिनिधीमंडळ आज शनिवारी पोहोचणार आहे. दोहा येथे अफगाणिस्तान अन्य देशांसमोर पाकिस्तानच खरं रुप उघड करु शकतो. दोहाला जाणाऱ्या अफगाणी प्रतिनिधीमंडळाने यावर काम सुरु केलं आहे. त्यामुळे अन्य देशांसमोर पाकिस्तानची लाज निघू शकते.
पाकिस्तानच म्हणणं काय?
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आरोप लावला आहे की, शुक्रवारी रात्री उत्तर वजीरिस्तानमध्ये एका सैन्य शिबिरावर आत्मघातकी हल्ला झाला. यात सात पाकिस्तानी सैनिक मारले गेले. 13 जखमी झाले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्याची पुष्टी केलेली नाही.
दोन्ही देशांमध्ये युद्ध का सुरु आहे?
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात मागच्या सात दिवसांपासून सशस्त्र संघर्ष सुरु आहे. डूरंड लाइन दोन्ही देशांमधील वादाचं मूळ कारण आहे. ब्रिटिश काळात भारत आणि अफगाणिस्तानात सीमा म्हणून इंग्रजांनी ही डूरंड लाइन ठरवली होती. दोन्ही देशातील पठाणांना ही डूरंड लाइन मान्य नाही. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच मूळ या सीमावादात आहे.
