ना दारुगोळा ना हिम्मत, 4 दिवसांत पाकिस्तान भारतापुढे फुस्स होणार; पण नेमकं कसं?

मच्याकडे अणुबॉम्ब आहे, आम्हीही तयार आहोत, अशा प्रकारची धमकी पाकिस्तान भारताला देत आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात खरंच युद्ध झालं तर पाकिस्तान भारतापुढे चार दिवसही टिकणार नाही.

ना दारुगोळा ना हिम्मत, 4 दिवसांत पाकिस्तान भारतापुढे फुस्स होणार; पण नेमकं कसं?
india vs pakistan
| Updated on: May 03, 2025 | 9:52 PM

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हीच शक्यता लक्षात घेता पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, आम्हीही तयार आहोत, अशा प्रकारची धमकी पाकिस्तान भारताला देत आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात खरंच युद्ध झालं तर पाकिस्तान भारतापुढे चार दिवसही टिकणार नाही. पण हे नेमकं कसं होणार? हे जाणून घेऊ या..

पाकिस्तानने नुकतेच इस्रायलला शस्त्रास्त्र पुरवठा केला

पाकिस्तानच्या युद्धासाठीच्या क्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सुरक्षा एजन्सीजनुसार टोकाचं युद्ध झालंच तर पाकिस्तानकडे फक्त चार दिवस पुरेल एवढाच दारुगोळा आहे. पाकिस्तानने नुकतेच इस्रायलला शस्त्रास्त्र पुरवठा केला आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या शस्त्रागारातील शस्त्रे कमी झाले आहेत. त्यामुळेच भारतापुढे पाकिस्तान जास्त दिवस टिकणार नाही, असे म्हटले जात आहे.

पाकिस्तानकडे दारुगोळा नाही?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची सेना प्रामुख्याने M109 हॉवित्झर, BM-21 मल्टीपल रॉकेट लॉन्चर तसेच नुकतेच आणण्यात आलेल्या SH-15 माउंटेड गन सिस्टमवर युद्धात अवलंबून आहे. मात्र सुरक्षा एजन्सीनुसार ही शस्त्र वापरण्यासाठी पाकिस्तानकडे दारुगोळा फार कमी आहे. पाकिस्तानच्या SH-15 या नव्या तोफांसाठी दारुगोळा नाहीये. त्यामुळेच भारतासोबत युद्ध झालेच तर पाकिस्तानकडे फक्त चार दिवस टिकेल एवढेच युद्धसामान आहे.

पाकिस्तानने युक्रेनला काय काय दिलं?

पाकिस्तानची आर्थिक स्थिती चांगलीच बिकट आहे. या देशाच्या डोक्यावर मोठे कर्ज आहे. परकीय चलनसाठाही कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या सेनेला राशन, तेल यामध्येही कपात करावी लागत आहे. पाकिस्तानचे माजी लष्कप्रमुख जनरल बाजवा यांनीच पाकिस्तान भारतापुढे युद्धात जास्त दिवस टिकू शकणार नाही, असं मान्य केलं होतं. 2 मे 2025 रोजी स्पेशल कॉर्प्स कमांडर्स कॉन्फरन्समध्येही पाकिस्ताननी सेनेच्या ऑफिसर्सने सध्या लष्कराची परिस्थिती बिकट असल्याचे मान्य केले होते.

पाकिस्तानची सध्याची ही परिस्थिती पाहता हा देश भारतापुढे युद्धात चार दिवसही टिकणार नाही, असा कयास व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्ष मात्र युद्ध चालू झालेच तर इतरही देश पाकिस्तानला मदत करू शकतात. त्याच पद्धतीने भारताच्या बाजूने काही देश उभे राहू शकतात. त्यामुळे युद्धात नेमकं काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.