AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : भारताने मारलं जास्त, सांगितलं कमी…पाकिस्तानची डोजियरमधून पहिल्यांदा मोठी कबुली

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानचा मोठा कबूलनामा समोर आलाय. 18 मे रोजी पाकिस्तानने अनेक देशांना डोजियर सोपवलं. त्यातून त्यांनी स्वत:च कबुली दिलीय. भारताने पाकिस्तानला किती खोलवर जखम दिलीय ते हे या बातमीमधून समजून घ्या.

Operation Sindoor : भारताने मारलं जास्त, सांगितलं कमी...पाकिस्तानची डोजियरमधून  पहिल्यांदा मोठी कबुली
operation sindoor
| Updated on: Jun 03, 2025 | 4:22 PM
Share

ऑपरेशन सिंदूर संदर्भात पाकिस्तानचा मोठा कबूलनामा समोर आलाय. भारतीय सैन्याने जो दावा केला होता, त्यापेक्षा या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच जास्त नुकसान झालय. पाकिस्तानच्या डोजियरमधून ही कबुली समोर आलीय. रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलय भारताने जास्त मारलं पण सांगितलं कमी. हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सांगितलं होतं की, पाकिस्तानात 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आलाय. पण डोजियरमध्ये मॅपच्या माध्यमातून सांगण्यात आलय की, भारताने पाकिस्तानात फक्त 9 नाही, जास्त ठिकाणी हल्ला केला.

मॅपमध्ये पेशावर, झांग, सिंधच्या हैदराबाद, पंजाबमध्ये गुजरांवाला, भवालनगर, अटक आणि छोर येथे हल्ला केल्याच दाखवण्यात आलय. मागच्या महिन्यात प्रेस ब्रीफिंगमध्ये सैन्यदलांनी या ठिकाणांची नाव घेतली नव्हती. पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान उन मार्सोस वर डोजियर बनवलं आहे. भारताने जी ठिकाणं सांगितली, त्यापेक्षा 8 जास्त ठिकाणांची नाव पाकिस्तानने घेतली आहेत. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते, भारताने पाकिस्तानात किती खोलवर हल्ले केलेत. 18 मे रोजी पाकिस्तानने अनेक देशांना डोजियर सोपवलं. त्यातून भारताने सांगितल्यापेक्षा मोठा हल्ला केल्याच समोर आलय. पाकिस्तानने स्वत:च आता ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याच कबूल केलय.

पाकिस्तानी डोजियरनुसार, भारताने आणखी किती ठिकाणी हल्ला केला?

पेशावर

झांग

सिंधमध्ये हैदराबाद

पंजाबमध्ये गुजरांवाला

भवालनगर

अटक

छोर

भारतीय सैन्यदलांनी 7 मे रोजीच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये किती ठिकाणी हल्ला केल्याची माहिती दिलेली ?

बहावलपूरध्ये जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय

मुरीदकेमध्ये लश्कर-ए-तैयबा दहशतवादी केंद्र

मुजफ्फराबाद

कोटली

रावलकोट

चकस्वारी

भीमबेर

नीलम घाटी

झेलम

चकवाल

भारताने माहिती देणं का टाळलं असावं?

भारताने ज्या ठिकाणी अतिरिक्त हल्ले केले, त्या बद्दल माहिती देणं प्रेस ब्रीफिंगमध्ये टाळलं, कदाचित हा रणनितीक निर्णय असावा. पाकिस्ताननेच त्यांच्या तोंडाने किती मोठ नुकसान झालय त्याची कबुली द्यावी हा त्यामागे उद्देश असू शकतो. 7 मे च्या पत्रकार परिषदेत भारताने फक्त आम्ही दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं, एवढच सांगितलं. पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताच्या पश्चिमी भागात नागरिक क्षेत्र आणि सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ड्रोन आणि मिसाइल्सचा पाऊस पाडला. पण त्यांचा हा प्रयत्न भारताच्या मजबूत हवाई सुरक्षा प्रणालीने हाणून पाडला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.