
पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या खाणी आणि गॅसबद्दल सातत्याने मोठा दावा करताना दिसत आहे. आता नुकताच पाकिस्तानने हैराण करणारा दावा केला. पाकिस्तानने म्हटले की, खैबर पख्तूनख्वामध्ये कच्चा तेलासोबत गॅसच्या खाणी मिळाल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी थेट देशाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्यांनी म्हटले की, आता आपले चलन मजबूत होईल. खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील कोहट जिल्हात नश्पा ब्लॉक येथे तेलासोबत गॅसचा भंडार हाती लागला आहे. हेच नाही तर येथून दररोज 4100 बॅरल तेल काढले जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले. 10.5 मिलियन क्यूबिक फीट गॅस सुद्धा काढला जाई शकतो.
खूप मोठे यश मिळाले असून यामुळे विदेशातून होणारी आयात कमी होईल, असेही त्यांनी म्हटले. शहबाज यांनी पेट्रोलियम आणि गॅस संबंध लोकांची एक बैठक देखील घेतली. पाकिस्तानची ऑईल गॅस डिव्हेलपमेंट कंपनी लिमिटेडने नश्पा ब्लॉकमध्ये गॅसच्या खाणीबद्दल भाष्य केले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानला मोठा गॅसचा भांडार मिळाला आहे. पाकिस्तान सध्या याकडे मोठे यश म्हणून बघत आहे.
यापूर्वीही बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानने गॅस आणि तेलाचे भांडार शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, खैबर पख्तूनख्वापासून ते बलूचिस्तानपर्यंत लोक या गोष्टीला विरोध करत आहेत. पाकिस्तान आमच्या नैसर्गिक संसाधनांचा चुकीचा वापर करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातून मिळणारा पैसा पाकिस्तान इथे खर्च करणार नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आता खरोखरच पाकिस्तानला अशा काही खाणी मिळाल्या का? हा एक संशोधनाचा मोठा विषय आहे.
मात्र, सातत्याने पाकिस्तानकडून याबद्दलचा दावा केला जात आहे. अमेरिकेने आम्हाला याकरिता मदत करावी, असेही काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने म्हटले होते. सोन्याची खान असल्याचेही त्यांनी म्हटले होते. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती फार जास्त वाईट आहे. कर्जाचा मोठा डोंगर पाकिस्तानवर आहे. आता पाकिस्तानला कर्ज देण्यासाठीही कोणी पुढे येत नसून पाकिस्तान भिकेला लागला आहे. यादरम्यानच अशाप्रकारे दावे त्यांच्याकडून केली जात आहेत.