AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : करो या मरो… सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर टीम इंडियाला हे करावंच लागेल ! संघासमोर मोठ्ठ चॅलेंज

Team India Net Run Rate : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 स्टेजमध्ये टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. आता भारताला फक्त विजय मिळवून चालणार नाहीये तर रन रेचवरही काम करावं लागणार आहे. झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळताना भारतीय संघासमोर मोठं चॅलेंज असेल.

T20 World Cup 2026 : करो या मरो... सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर टीम इंडियाला हे करावंच लागेल ! संघासमोर मोठ्ठ चॅलेंज
टीम इंडियाImage Credit source: PTI
| Updated on: Feb 24, 2026 | 10:01 AM
Share

T20 World Cup 2026, Team India Net Run Rate : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 स्टेजमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा भारतीय संघाचा मार्ग आता चांगलाच खडतर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचा नेट रन रेट (NRR) -3.800 वर पोहोचला आहे. आता ग्रुप 1 मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचे दोन महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. मात्र सेमीफयानलमध्ये प्रवेश करायचा असेल तरटीम इंडियाला हे दोन्ही सामने जिंकावे लागतील, एवढंच नव्हे तर NRR मध्ये (Net Run Rate) देखील लक्षणीय सुधारणा करावी लागेल. कारण टायमध्ये NRR हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. टीम इंडियाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. त्यामुळे या मॅचमध्ये Net Run Rate हा निगेटीव्ह वरून पॉझिटिव्ह , प्लस कसा होईल याकडे संघाचं संपूर्ण लक्ष असणार आहे.

टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज

पुढल्या सामन्यात भारताला झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल, तसेच रन-रेटमध्ये देखील लक्षणीय फरक निर्माण करावा लागेल. जर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना झिम्बाब्वेला कमी धावसंख्येतच रोखावं लागेल आणि त्यांनी दिलेल्या टार्गेटचाही लवकर पाठलाग करून मॅच जिंकावी लागेल. टार्गेट जितकं छोटं, तितक्या पटकन, लवकर चे पूर्ण करण्याची गरज असेल, आणि त्यासाठी आक्रमक फलंदाजी करणंही महत्वाचं ठरेल. लक्ष्य लवकर गाठावे लागेल.

किती रनचं टार्गेट किती ओव्हर्समध्ये गाठावं लागेल ?

समजा पुढल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने जर केवळ 90 धावा केल्या तर भारताला हे टार्गेट फक्त 9 ओव्हर्समध्ये गाठावं लागेल. इतक्या जलद पाठलागामुळे NRR( रन रेट) मध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते आणि नकारात्मक निकालाचे सकारात्मक निकालात रूपांतर होण्याची शक्यताही वाढू शकते.

पण जर 150 धावांचं टार्गेट असेल तर टीम इंडियाल 11 ओव्हर्समध्येच विज मिळवावा लागेल, ही खूप कठीण असेल, पण पहिल्या फळीने आक्रमक, स्फोटक खेळी केली तर हे शक्य आहे. अशा स्थितीतच भारताचा निगेटीव्ह रन रेट हा पॉझिटिव्ह होऊ शकतो.

पण जर झिम्बाब्वेच्या संघाने 180 ते 200 च्या मध्ये धावा केल्या, तर भारताला 12 ते15 ओव्हर्समध्येच मॅच संपवावी लागेल. यामुळे NRRमध्ये सुधारणा होईल, मात्र सकारात्मक निकाल मिळविण्यासाठी एवढंच बाकी नाही, अजूनही मेहनत करावीच लागेल. म्हणजेच, याचा अर्थ असा की, टार्गेट जितकं मोठं रिक्वायर्ड रन रेटही तितकाच जास्त असेल.

पहिले फलंदाजी केली तर ?

मात्र या सामन्यात टीम इंडियाने जर प्रथम फलंदाजी केली तर नेट रन रेट नकारात्मक (-) वरून सकारात्मक (+) वर आणणं थोडं कठीण होऊ शकतं. भारताला प्रथम फलंदाजी करताना 220 किंवा 250+ धावा कराव्या लागतील. त्यानंतर, त्यांना विरोधी संघाला 100-120 धावा किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येपर्यंतच रोखाव लागेल. जर भारतीय संघाने विरोधी संघाला बाद केले तर त्यांना जास्त षटके टाकण्याचा फायदा होईल, कारण ऑलआउट झाल्यास, नेट रन रेटमध्ये महत्त्वाचा फायदा होतो. पहिल्या सामन्यात टीम इंडिया स्वतःच ऑलआऊट झाली होती, म्हणूनच संघाचा नेट रन रेट इतका खालावला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...