AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई एअरपोर्टवर उतरताय? सावधान! प्रवाशांनो चुकूनही ही चूक करू नका, नाहीतर…

मुंबई विमानतळाबाहेर सुरू असलेल्या टॅक्सी माफियांच्या लुटीचा सविस्तर अहवाल समोर आला आहे. या बनावट अॅप्सद्वारे ४०० मीटरसाठी १८ हजार रुपयांपर्यंतची लूट आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई एअरपोर्टवर उतरताय? सावधान! प्रवाशांनो चुकूनही ही चूक करू नका, नाहीतर...
mumbai airport
| Updated on: Feb 24, 2026 | 9:22 AM
Share

देशातील सर्वात व्यस्त मानल्या जाणाऱ्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची उघडपणे लूट सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळाच्या गेटमधून बाहेर पडताच प्रवाशांना गाठून, तांत्रिक फेरफार केलेले मीटर आणि बनावट टॅक्सी रेंटल अॅप्सच्या आधारे हजारो रुपये उकळले जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आता या टोळ्यांनी परदेशी पर्यटकांसोबतच भारतीय विद्यार्थ्यांनाही टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.

कशाप्रकारे होते फसवणूक?

गेल्या काही दिवसांत प्रवाशांना लुबाडण्यासाठी एका नवीन पद्धतीचा वापर केला जात आहे. हे चालक स्वतःच्या मोबाईलमध्ये एक अनधिकृत अॅप ठेवतात. जे हुबेहूब प्रसिद्ध टॅक्सी अॅग्रीगेटर कंपन्यांसारखे Ola आणि Uber दिसते. प्रवाशाने ठिकाण सांगितल्यावर चालक या बनावट अॅपमध्ये ते ठिकाण टाकतो. हे अॅप जाणीवपूर्वक १० ते १५ पट अधिक भाडे दाखवते. प्रवाशाला वाटते की हे अधिकृत दर आहेत आणि ते फसवणुकीला बळी पडतात.

मुंबई विमानतळाबाहेर आतापर्यंत अनेक प्रवाशांना लुबाडण्यात आले आहे. या घटनांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एका परदेशी पर्यटकाला विमानतळाजवळील हॉटेलमध्ये सोडण्यासाठी चक्क १८ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्याचे हॉटेल विमानतळापासून ४०० मीटर अंतरावर होते. मात्र त्यासाठी त्याच्याकडून तब्बल १८ हजार रुपये मागण्यात आले. तर दुसरीकडे थायलंडवरून आलेल्या एका जोडप्याला वडाळ्याला जाण्यासाठी टॅक्सीवाल्याने ३ हजार रुपये आकारले. वास्तविक हे भाडे ५००-६०० रुपयांच्या आसपास असते. तसेच मुंबई विमानतळावरुन विलेपार्लेला जाण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात. या अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी विलेपार्ले जाण्यासाठी एका प्रवाशाला २८०० रुपये मोजावे लागले.

विमानतळाच्या टी-२ (T2) टर्मिनलबाहेर परवाना नसलेले आणि बेकायदा ऑफलाइन बुकिंग करणारे अनेक एजंट सक्रिय आहेत. हे एजंट स्वस्त दरात टॅक्सी देण्याचे आमिष दाखवून प्रवाशांना अनधिकृत गाड्यांकडे नेतात. एकदा प्रवासी गाडीत बसला की वाटेत किंवा गंतव्य स्थानी पोहोचल्यावर पैशांसाठी दमदाटी केली जाते.

कारवाईत नेमके अडथळे काय?

मुंबई पोलीस आणि आरटीओ (RTO) यांच्याकडून अधूनमधून मोहिमा राबवल्या जातात. मात्र ठोस कारवाई होत नाही. बहुतांश प्रवासी विशेषतः पर्यटक पोलीस ठाण्यात जाऊन वेळ घालवण्यापेक्षा पैसे देऊन सुटका करून घेणे पसंत करतात. बनावट अॅप्सवरील व्यवहार रोख किंवा खाजगी यूपीआय (UPI) वर होत असल्याने त्याचा माग काढणे कठीण जाते.

प्रवाशांसाठी महत्त्वाची नियमावली

विमानतळाच्या आत असलेल्या अधिकृत प्रिपेड टॅक्सी किंवा ब्लॅक अँड येल्लो टॅक्सी काउंटरवरूनच पावती फाडून गाडी घ्या. स्वतःच्या मोबाईलमधील अधिकृत अॅपवरूनच बुकिंग करा. चालकाने दाखवलेल्या कोणत्याही स्क्रीनवर विश्वास ठेवू नका. फसवणूक झाल्यास तात्काळ १०० किंवा १०३ या क्रमांकावर किंवा जवळच्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.