पाकिस्तान बिथरलं, युद्धाची तयारी सुरु, रुग्णालयांना पत्र

इस्लामाबाद:  पुलावमा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारताकडून चहूबाजूंनी पाकिस्तानची नाकेबंदी सुरु आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय दबावाने पाकिस्तान पुरता बिथरला आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला भारत जरुर घेईल, या भीतीने पाकिस्तानने युद्धाबाबत तयारी सुरु केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक घेऊन, पाकिस्तानी सैन्याला भारताच्या हल्ल्यास तयार राहण्याच्या सूचना देण्यात …

पाकिस्तान बिथरलं, युद्धाची तयारी सुरु, रुग्णालयांना पत्र

इस्लामाबाद:  पुलावमा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारताकडून चहूबाजूंनी पाकिस्तानची नाकेबंदी सुरु आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय दबावाने पाकिस्तान पुरता बिथरला आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला भारत जरुर घेईल, या भीतीने पाकिस्तानने युद्धाबाबत तयारी सुरु केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत बैठक घेऊन, पाकिस्तानी सैन्याला भारताच्या हल्ल्यास तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर पाकिस्तानातील रुग्णालयांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पत्र माध्यमात व्हायरल झालं आहे.

याशिवाय पाकिस्तानची इतकी घाबरगुंडी झाली आहे की त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि नियंत्रण रेषेजवळील गावांतील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. त्यासाठी खास नियमावली जारी केली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थानिक प्रशासनाने रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे. जर पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झालं, तर मदतीसाठी सज्ज राहा, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पाकिस्तानने भारताविरोधी लढाईची तयारी केली आहे. 21 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमधील प्रशासनाने एलओसीजवळील नीलम, झेलम, रावलकोट, हवेली, कोटली आणि भिंबर या गावांमध्ये नोटीस पाठवली आहे. भारताकडून होणाऱ्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी सतर्क राहा, असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

बंकर तयार का, LOC जवळ जाऊ नका

भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगितलं आहे. समूहाने राहू नका, एलओसीजवळ विनाकारण जाऊ नका, केवळ आवश्यकता भासली तरच लाईट लावा अशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय एलओसीजवळ राहणाऱ्या नागरिकांना बंकर बनवण्यास सांगितलं आहे.

संबंधित बातम्या 

पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय    

पाकिस्तानला जाणारं पाणी यमुनेत वळवणार, गडकरींचं जालीम अस्त्र   

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *