AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : 5-10 नाही, भारताने किती मिसाइल डागली? त्या आकड्याबद्दल पहिल्यांदाच पाक गृहमंत्र्यांची मोठी कबुली

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने पाकिस्तानात किती मिसाइल डागली? त्या बद्दल पहिल्यांदाच पाकिस्तानातून मोठी कबुली आली आहे. स्वत: त्यांच्या गृहमंत्र्यांनी हा आकडा सांगितला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात सैन्याच खोट कौतुक सुरु आहे.

Operation Sindoor : 5-10 नाही, भारताने किती मिसाइल डागली? त्या आकड्याबद्दल पहिल्यांदाच पाक गृहमंत्र्यांची मोठी कबुली
pakistan home minister mohsin naqvi
| Updated on: Jul 04, 2025 | 1:55 PM
Share

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी पहिल्यांदाच हल्ल्याबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे. भारताने 7 मे च्या रात्रीपासून पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं. समा टीवीनुसार मोहसीन नकवी म्हणाले की, भारताने त्या जागी मिसाइल मारले, जिथे आमचे फायटर जेट्स आणि सैनिक होते. या हल्ल्यात पाकिस्तानच किती नुकसान झालं? त्या बद्दल नकवी बोलले नाहीत. मोहर्रम संदर्भात आयोजित बैठकीत नकवी म्हणाले की, भारताने एकूण 11 मिसाइल्स डागली होती.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात सैन्याच खोट कौतुक सुरु आहे. स्वत: पंतप्रधान शहबाज शरीफ या खोट्या कौतुकाच नेतृत्व करतायत. पाकिस्तानी सरकारमधील छोटे-मोठे अधिकारी असीम मुनीरला श्रेय देत आहेत. असीम मुनीर हा जिहादी मानसिकतेचा पाकिस्तानी लष्करप्रमुख आहे. चार दिवसाच्या लढाईत भारताकडून हार झाल्यानंतरही पाकिस्तानने विजयाचे खोटे ढोल बडवले. असीम मुनीरने स्वत:ला फिल्ड मार्शल ही पदवी लावून घेतली. भारताने 11 मिसाइल मारल्याची नकवीने कबुली दिली. निश्चितच या कबुलीनंतर पाकिस्तानात आता मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

मसूद अजहरच्या कुटुंबात किती मारले गेले?

7 मे च्या रात्री भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात लष्करच मुख्यालय मुरीदके, बहावलपूरमध्ये असलेलं जैशच्या मुख्यालयासह 9 ठिकाणी हल्ला करण्यात आला. ही सर्व ठिकाणं उद्धवस्त झाली. जैशचा प्रमुख दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 पेक्षा जास्त लोक या स्ट्राइकमध्ये मारले गेले.

पाकिस्तानात एकूण किती दहशतवादी मारले गेले?

लष्करचा सुद्धा भरपूर नुकसान झालं. या स्ट्राइक नंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच हे ड्रोन्स नष्ट केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानी एअरबेस जोरदार हल्ल्यात उद्धवस्त केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानने अधिकृतरित्या याची संख्या 45 सांगितली आहे.

सर्व दहशतवाद्यांच थेट कनेक्शन पाकिस्तानशी

एप्रिल 2025 मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे लश्कर आणि रेजिडेंट फ्रंट्सच्या दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांच थेट कनेक्शन पाकिस्तानशी होतं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं.

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.