AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 ने पत्रकारितेचा उच्च दर्जा राखला, जर्मनीतील न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये अनुराग ठाकुर यांचे वक्तव्य

जर्मनीतील न्यूज 9 ग्लोबल समिट मध्ये भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी TV9 नेटवर्कला 'TV माईन' म्हणत पत्रकारितेच्या उच्च मानकांचे कौतूक केले पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासावर आणि जागतिक भूमिकेवर त्यांनी भर दिला. ठाकूर यावेळी म्हणाले की भारत कोणत्याही दहशतवादी कृत्याला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.

TV9 ने पत्रकारितेचा उच्च दर्जा राखला, जर्मनीतील न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये अनुराग ठाकुर यांचे वक्तव्य
anurag thakur
| Updated on: Oct 09, 2025 | 5:48 PM
Share

भारताचे प्रमुख न्यूज नेटवर्क, टीव्ही 9 नेटवर्कद्वारा आयोजित न्यूड 9 ग्लोबस सिमटची दुसरी आवृत्ती गुरुवारी जर्मनीच्या स्टटगार्ट येथे सुरु झाली. या परिषदेत सहभागी होत भाजपा खासदार आणि भारत सरकारचे कोळसा, खाण आणि पोलाद संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी टीव्ही 9 च्या धोरणाचे कौतूक केले. याच बरोबर दहशतवादाला स्थान देणाऱ्या पाकिस्तानवर जोरदार टीका केली. त्यांनी भारत पाकिस्तानच्या कोणत्याही धाडसाला प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट केले.

अनुराग ठाकुर यांनी या निमित्ताने भारत आणि जर्मनी दरम्यानच्या विकास संबंधांवर जोर दिला आणि पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासावर भाष्य केले.

ते म्हणाले की जर्मनी भारताचा खूप चांगला मित्र राहिला आहे. आमची मैत्री काळाच्या कसोटीवर उतरली आहे. ते म्हणाले की मी टीव्ही 9 ला मला न्यूज 9 ग्लोबल समिटच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी आमंत्रण देण्यासाठी धन्यवाद देत आहे. माझ्यासाठी आता टीव्ही 9 केवळ एक न्यूज चॅनल नाही तर टीव्ही माईन आहे.

टीव्ही 9 ने पत्रकारितेचा सर्वोच्च ग्लोबल मापदंड बनवला

अनुराग ठाकुर यांनी यावेळी म्हणाले की टीव्ही 9 ने पत्रकारितेचा सर्वोच्च ग्लोबल मापदंड बनवला आहे. अशा वेळी जेव्हा दुर्भावनापूर्ण मोहिम चालवली जात आहे आणि प्रयत्न केला जात आहे.आपल्या लोकशाही आणि प्रगतीशील देशाविरुद्ध सूडाने मोहीम चालवली जात आहे.त्यावेळी टीव्ही 9 सातत्याने सत्या सोबत उभा राहीला आहे. त्यांच्या नजरा आता भारताच्या उत्थानावर टीकल्या आहेत.

त्यांनी सांगितले की टीव्ही 9 ने सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात होणाऱ्या विकासाची बात केली. ते म्हणाले की आपण एक डेमोक्रेटिक आणि इनक्लूजिव्ह सोसायटी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश पुन्हा आपल्या क्षमतांचा शोध घेत आहे आणि आपली भूमिका पुनर्परिभाषित करत आहे आणि भारत न्यू ग्लोबल ऑर्डरमध्ये आपली भूमिका निभावत आहे.

ठाकूर यावेळी म्हणाले की मला फेब्रुवारीत जर्मनीत येण्याची संधी मिळाली होती. जर्मनीत आपल्या समकक्ष सहकाऱ्यांसोबत निती, लोकतांत्रिक व्यवस्था आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था या संदर्भात प्रदीर्घ चर्चा करण्याची संधी मिळाली होते. चर्चेत एका वक्त्याने भारताने वास्तवात ग्लोबल ऑर्डरचे रिफ्रेश बटण दाबले आहे. त्यावेळी मी सांगितले की भारताने रिफ्रेश बटण दाबलेले नाही., त्याऐवजी भारताने ग्लोबल ऑर्डरचे रिसेट बटण दाबले आहे. मला काही आश्चर्य वाटत नाही की मला पुन्हा त्याच विषयावर बोलायला बोलवले आहे.

कोणत्याही अतिरेकी हल्ल्याला योग्य उत्तर मिळेल

ते यावेळी म्हणाले की फ्रेब्रुवारी ते ऑक्टोबर पर्यंत ग्लोबल फ्रंटवर भारता संदर्भात अनेक घटना घडल्या आहेत. जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे आपल्या लोकांवर घातक अतिरेकी हल्ला केला गेला. अतिरेक्यांनी धर्म विचारुन निर्दोष लोकांना ठार केले, तुम्ही सर्व जाणता यामागे कोणता देश होता. हा तो देश आहे जो जगात दहशतवाद निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जातो.

अनुराग ठाकुर म्हणाले की दशकांपासून सुपर पॉवरने त्या लोकांना सांगितले होते की पाकिस्तानच्या सोबत दहशतवाद दरम्यान शांत रहा. कारण आपण आपले शेजारी बदलू शकत नाही. या प्रकारे दहशतवादाला ग्लोबल शांती, समृद्धी आणि लोकांच्या जीवनाच्या नावाखाली वाचवले गेले. कारण आपण शेजारी बदलू शकत नाही. परंतू जे दहशतवादाला मदत करतात आणि त्यांना आश्रय देतात. त्यांनी लाईन क्रॉस करण्याचे परिणाम ओळखावे.

ते म्हणाले जग याला साक्षी आहे की दहशतवाद आणि त्यांच्या म्होरक्यांना आश्रय देणाऱ्यांची काय झाले आहे.भारत कोणत्याही अतिरेकी हल्ल्याचा सैन्य हल्ल्याने उत्तर देऊ शकतो. अतिरेकी हल्ल्यानंतर भारताचे शिष्ठमंडळ अनेक देशात गेले. सर्वांनी भारतासोबत सहमती दर्शवली.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.