आधी युद्धाची धमकी, आता भारतापुढे गुडघे टेकले, पाकिस्तानी नेता काय म्हणाला?

पाकिस्तानच्या ज्या नेत्याने भारताला थेट युद्धाची धमकी दिली होती, तोच नेता आता नरमला आहे. या नेत्यांनी भारत-पाकिस्तानने एकत्र काम करायला हवं, असं मत व्यक्त केलंय.

आधी युद्धाची धमकी, आता भारतापुढे गुडघे टेकले, पाकिस्तानी नेता काय म्हणाला?
shehbaz sharif and bilawal bhutto
| Updated on: Jul 02, 2025 | 10:39 PM

India Vs Pakistan : जम्मूमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढला. पहलगामवर झालेल्या या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जशास तसे उत्तर दिले. भारताच्या या मोहिमेनंतर पाकिस्तानी नेत्यांकडून अनेक आक्रमक विधानं केली जाऊ लागली. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी तर भारताला उघडपणे धमकी दिली होती. आता मात्र हेच भुत्ते नरमले आहेत. त्यांनी दहशतवादाविषयी बोलताना भारताने आणि पाकिस्तानने एकत्र आलं पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आहे.

 बिलावल भुत्ते नेमकं काय म्हणाले?

भारत आणि पाकिस्तानने दहशतवादाविरोधातील लढाई एकत्र मिळून लढली पाहिजे, असं बिलावल भुत्तो यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्वच बाजूंनी नाकेबंदी करण्यास सुरुवात केली होती. भारताने पाकिस्तासोबतच्या सिंधू जरलवाटप कराराला स्थगिती दिलेली आहे. तसेच पाकिस्तानसोबत कोणताही व्यापार करणार नाही, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. सिंधू जलवाटप करार स्थगित केल्याने पाकिस्तानपुढे अनेक भागाला शेती, उद्योग तसेच इतर कामासाठी पाण्याच्या दुर्भिक्षाचे संकट उभे राहू शकते. तसेच भारताने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास मनाई केल्यामुळे तेथे मालवाहू जहजांचा प्रवासही महागला आहे. अशा सर्वच पातळीवर फटका बसलेला असताना आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन दहशतवादाविरोधातली लढाई लढली पाहिजे, असे मत मांडले आहे.

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान दिली होती धमकी

भुत्ते इस्लामाबाद थे पॉलिसी रिस र्च इन्स्टिट्यूटमध्ये ‘जगासाठी पाकिस्तानची दहशतवादविरोधी लढाई’ या विषयावर बोलत होते. यावेळी बोलतानाच भुत्तो यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. दहशतवादाविरोधात लढाई देण्यासाठी पाकिस्तान भारतासोबत भागिदारी करण्यास तयार आहे. पाकिस्तान भारताला साथ द्यायला तयार आहे. एकमेकांच्या विरोधात नव्हे दोघांनीही सोबत मिळून एक अब्ज लोकांना दहशतवादापासून वाचवण्यासाठी काम करायला हवं. दोन्ही शेजारी राष्ट्रांनी एकत्र यायला हवं, असं मतं भुत्तो यांनी मांडलंय.

याच बिलावल भुत्तो यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता, त्यावेळी थेट युद्ध करण्याची धमकी दिली होती. सिंधू जलवाटप करारावरील स्थगिती मागे घेतली नाही तर, पाकिस्तान युद्धासाठी तयार आहे, असं विधान त्यांनी केलं होतं. तसेच पाकिस्तानच्या ज्या नद्यांचं पाणी वापरण्याची भारताला परवानगी आहे, ती परवानगी आम्ही रद्द करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आता याच भुत्तो यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.