AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Map : पाकिस्तानच्या नकाशात मोठा बदल, 4 प्रांतांचे तब्बल 15 तुकडे, असीम मुनीरच्या डोक्यात काय शिजतंय?

पंजाब प्रांतात 12.8 कोटी लोक राहतात. तर बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची सख्या फक्त 1.5 कोटी आहे. पंजाब आणि सिंध हो दोन प्रांत पाकिस्तानचे राजकीय सत्ताकेंद्र असल्याचे बोलले जाते.

Pakistan Map : पाकिस्तानच्या नकाशात मोठा बदल, 4 प्रांतांचे तब्बल 15 तुकडे, असीम मुनीरच्या डोक्यात काय शिजतंय?
pakistan map change Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 5:30 PM
Share

Pakistan Map Change : पाकिस्तान हा असा देश आहे जिथं नेहमीच काहीतरी होत असतं. आंदोलन, मोर्चे तर रोजच असतात. या देशात दहशतवादी संघटनाही कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या देशात दहशतवादाला खतपाणी घातलं जातंय. पाकिस्तान याच दहशतवादाचा बळीदेखील ठरलेला आहे. एकीकडे दहशतवादाचे आव्हान आणि दुसरीकडे गरिबीविरोधातील संघर्ष अशा दोन पातळ्यांवरील आव्हानांना पाकिस्तान सामोरे जात असतो. दरम्यान, एकीकडे हा संघर्ष चालू असताना दुसरकीडे पाकिस्तानातील चार प्रांतांचे तब्बल 12 ते 16 तुकडे होऊ शकतात. पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसीम मुनीर हाच पाकिस्तानाचे तुकडे करण्याच्या विचारात आहे.

पाकिस्तानात नेमकी काय योजना आखली जातेय?

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील चार प्रमुख प्रांताचे आणखी तुकडे होऊ शकतात. या चार प्रांतांना आणखी छोटं करून त्याचे 12 ते 15 प्रांत केले जाऊ शकतात किंवा 160 छोटी राज्येही निर्माण केली जाऊ शकतात. या योजनेवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जातेय.

सध्या पाकिस्तानात किती प्रांत आहेत?

पाकिस्तानच्या राजकारणात तेथील लष्कराची महत्त्वाची भूमिका असते. विशेष म्हणजे देशाचे धोरण ठरवणारे अनेक निर्णय लष्कराला विचारूनच घेतले जातात. सध्या पाकिस्तानी लष्काराचे प्रमुख आसीम मुनीर हे आहेत. तेच पाकिस्तानचे 12 ते 15 प्रांतांत विभाजन करण्याच्या विचारात आहेत. पाकिस्तानात पंजाब हा सर्वात मोठा प्रांत आहे. त्यानंतर सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान असे इतर तीन प्रांत आहे. पंजाब प्रांतात लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. तर बलुचिस्तान हा प्रांत क्षेत्रफळाने सर्वात मोठा असला तरीही तेथे लोकसंख्या खूपच कमी आहे.

पंजाब आणि सिंध दोन राजकीय शक्तीकेंद्र

पंजाब प्रांतात 12.8 कोटी लोक राहतात. तर बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची सख्या फक्त 1.5 कोटी आहे. पंजाब आणि सिंध हो दोन प्रांत पाकिस्तानचे राजकीय सत्ताकेंद्र असल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सोईचे ठरावे म्हणून पाकिस्तानात या चार प्रांतांना आणखी 12 ते 15 प्रांतात विभागण्याचा प्रयत्न होणार आहे. अद्याप ही योजना कागदावरच आहे. परंतु असा काही निर्णय घेतला गेला तर पाकिस्तानला याचा काय फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...