पाकिस्तान राजकारणात भूकंपाचे संकेत, शरीफ सरकार संकटात, विरोधी आघाडींना लष्कराचे पाठबळ
इम्रान खान सध्या तुरुंगात आहे. तुरुंगात असूनही त्यांची पक्षाची पकड मजबूत होत आहे. परंतु विरोधी आघाडी स्थापनेचा प्रयत्न वेगाने सुरु आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा इम्रान खान यांना होणार आहे. JUI-F विरोधी पक्षात सामील झाल्यास इम्रान खानला आणखी बळ मिळेल. तसेच पाकिस्तानी लष्कर सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये आहे.

Pakistan Sharif Government: पाकिस्तानच्या राजकारणातील गोंधळ कधी कमी होत नाही. पाकिस्तानच्या राजकारणात पाकिस्तानी सैन्याचा असलेला हस्तक्षेप नेहमीच चर्चेचा विषय ठरला. आता इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) त्यांची विरोधी आघाडी मजबूत करत आहे. त्यांना JUI-F प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांचाही पाठिंबा मिळत आहे. त्याचा फायदा इम्रान खान याला मिळणार आहे. त्यासोबत पाकिस्तानी लष्कर त्या बाजूने झुकत आहे. त्यामुळे विद्यामान शहबाज शरीफ यांच्या सरकारसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत.
शहबाज सरकारविरोधात नाराजी
पीटीआयने मौलाना फजलुर रहमान यांना विरोधी आघाडीत समाविष्ट करण्यासाठी चर्चा सुरु केली आहे. अलीकडेच विरोधी पक्षनेते उमर अयुब खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फजलुर रहमान यांची भेट घेतली होती. तेव्हापासून, JUI-F देखील युतीमध्ये सामील होऊ शकते, अशी चर्चा जोर धरत आहे. मौलाना फजलुर रहमान विरोधी आघाडीत सामील झाल्यास शहबाज शरीफ सरकारची स्थिती आणखी कमकुवत होऊ शकते. शहबाज सरकार विरोधात पाकिस्तानमध्ये नाराजी वाढत असताना सर्व राजकीय विरोधक एकत्र येत आहे. पीटीआय आणि तहरीक-ए-तहफुज-ए-आयन पाकिस्तान (टीटीएपी) आता सिंधमध्ये आपली स्थिती मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत.
इम्रान खानची पकड मजबूत
इम्रान खान सध्या तुरुंगात आहे. तुरुंगात असूनही त्यांची पक्षाची पकड मजबूत होत आहे. परंतु विरोधी आघाडी स्थापनेचा प्रयत्न वेगाने सुरु आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा इम्रान खान यांना होणार आहे. JUI-F विरोधी पक्षात सामील झाल्यास इम्रान खानला आणखी बळ मिळेल. तसेच पाकिस्तानी लष्कर सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये आहे.
सरकार विरोधात योजना बनवणार
टीटीएपीचे नेते महमूद अचकझाई आणि शाहिद खाकान अब्बासी यांनी 26-27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली आहे. या अधिवेशनामध्ये देशातील सर्व प्रमुख प्रश्नांवर चर्चा करून सरकारविरोधात भविष्यातील रणनीती आखली जाणार आहे. JUI-F चे प्रवक्ता असलम गौरी यांनी म्हटले की, मौलाना कोणत्या पदासाठी नाही तर सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आघाडीत सहभागी होणार आहे. तसेच पक्षाकडून देशातील उद्योजक, वकील आणि पत्रकारांनाही संपर्क केला जात आहे.
