Pakistan: पाकिस्तानचे तुकडे होण्याची वेळ आली आहे, बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
पाकिस्तानने आपल्याच देशातील खैबर पख्तूनख्वा प्रदेशात केलेल्या हवाई हल्ल्यात 30 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर आता एका नेत्याने पाकिस्तानचे तुकडे होण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानची अवस्था किती वाईट आहे हे काही नवीन सांगण्याची गरज नाही. पाकिस्तानने आपल्याच देशातील खैबर पख्तूनख्वा प्रदेशात केलेल्या हवाई हल्ल्यात 30 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. खैबर पख्तूनख्वा हा कमी महत्त्वाचा प्रदेश आहे, मात्र जर हा हल्ला पंजाबमध्ये झाला असता तर सरकारची अडचण वाढली असती. या भागात आदिवासी लोक राहतात त्यामुळे मीडियाने या प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानचे लष्कर आणि सुरक्षा संस्था बऱ्याच काळापासून या भागांवर हल्ला करत आहे. त्यामुळे या भागातील लाखो लोक विस्थापित झाले आहेत, परिणामी विकास खुंटला आहे. अशातच आता अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानची धोरणे नेहमीच पंजाबच्या विकासाच्या हेतूने बनवण्यात आलेली आहेत. आदिवासी पट्ट्यातील लोकांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे तेथील लोकांमध्ये असंतोष पसरला आहे.
अमरुल्लाह सालेह काय म्हणाले?
अमरुल्लाह सालेह यांनी तालिबानविरुद्ध लढा दिला होता. आता सालेह यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानने तालिबानला अफगाणिस्तानात वाढण्यास खतपाणी घातले होते. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था तालिबानला मदत करून मोठी चूक करत आहेत. जर पाकिस्तानी हवाई दलाने पंजाबमध्ये 23 नागरिक मारले असते तर काय झाले असते? खैबर पख्तूनख्वाच्या डोंगराळ भागात नागरिकांच्या घरांवर बॉम्बहल्ला केला. हा आदिवासी प्रदेश नेहमीच पाकिस्तानी समाजाचा दुर्लक्षित भाग राहिलेला आहे.’
पुढे बोलताना सालेह यांनी म्हटले की, पाकिस्तान आपल्याच देशातील लोकांवर हल्ला करत आहे ही पाकिस्तानच्या विघटनाची सुरुवात नाही का? मला नक्कीच वाटते की ही सुरुवात आहे. तालिबान, टीटीए आणि टीटीपी हे पाकिस्तानने तयार केलेले विष आहे. याचा त्यांना फटका बसेल. कारण पाकिस्तान आपल्यात राज्यांमध्ये भेदभाव करत आहे. यामुळे फुटीरतावादाला खतपाणी मिळत आहे. ज्यामुळे देशाचे तुकडे होऊ शकतात आणि आता ती वेळ आली आहे.
