पंतप्रधान मोदींना पत्र लिहण्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अडचणीत; शरीफ यांचे उत्तर म्हणजे अत्यंत कमकुवत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister Imran Khan) यांच्या अडचनींच्या बातम्या येत असतानाच आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan’s new Prime Minister Shahbaz Sharif) हे त्यांच्याच देशात घेऱले जात असल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Modi) शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान झाल्याबद्दल ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला […]

पंतप्रधान मोदींना पत्र लिहण्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अडचणीत; शरीफ यांचे उत्तर म्हणजे अत्यंत कमकुवत प्रतिक्रिया
पंतप्रधान शाहबाज शरीफImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 2:14 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister Imran Khan) यांच्या अडचनींच्या बातम्या येत असतानाच आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan’s new Prime Minister Shahbaz Sharif) हे त्यांच्याच देशात घेऱले जात असल्याचे समोर येत आहे. पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Modi) शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान झाल्याबद्दल ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला उत्तर दिल्यावरून शरीफ हे आपल्याच देशात अडचणीत अडकल्याचे दिसत आहेत. शाहबाज शरीफ यांनी पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात लिहिले होते की, दोन्ही देशांच्या शांतता आणि विकासासाठी जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि इतर वादग्रस्त प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यावरून आता पाकिस्तानमध्ये चांगले राजकारण तापवले जात आहे. तर त्यांच्यावर पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आणि भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी ट्विटरवरून निशाना साधला आहे. त्यात त्यांनी शाहबाज शरीफ यांचे उत्तर म्हणजे अत्यंत कमकुवत प्रतिक्रिया असल्याचे म्हटले आहे.

शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन

पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्याबद्दल शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन करताना पीएम मोदींनी ट्विट केले की, ‘मियां मुहम्मद शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. भारत दहशतवादमुक्त क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य मिळवू इच्छितो. जेणेकरून आम्ही आमच्या विकासातील अडथळे दूर करू शकू आणि आमच्या लोकांचे कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करू शकू. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदन संदेशाला उत्तर देताना शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या पत्रात लिहिले, ‘माझे अभिनंदन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार. पाकिस्तानला जम्मू-काश्मीरसह सर्व प्रश्नांवर शांततापूर्ण तोडगा हवा आहे. दहशतवादाशी लढताना पाकिस्तानने दिलेले बलिदान सर्वांनाच माहीत आहे. चला एकत्र शांतता सुनिश्चित करू आणि आपल्या लोकांच्या सामाजिक-आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करूया. पाकिस्तान भारताशी शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंधांना अनुकूल आहे.

पत्राचा समाचार अब्दुल बासित यांनी घेतला

त्यानंतर त्यांच्या या पत्राचा समाचार अब्दुल बासित यांनी घेतला आहे.तसेच त्यांनी त्यावर ट्विट करताना, हा एक कमकुवत प्रतिसाद होता. काश्मीर हा मुद्दा नसून वाद आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या अभिनंदन संदेशात दहशतवादाचा उल्लेख केला. पण काश्मीरमध्ये भारताच्या राज्याने आर्थिक मदत केलेल्या दहशतवादाचे काय? आणि कमांडर कुलभूषण जाधव यांचे काय? पाकिस्तानला अशा माफीची गरज नाही.

यावर एका यूजरने विचारले की, मग पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पहिल्याच संभाषणात भारतासोबत युद्धाची घोषणा करायला हवी होती का? प्रत्युत्तरात अब्दुल बासित म्हणाले, ‘मला एवढेच म्हणायचे होते की भारताला अधिक चांगले उत्तर देता आले असते.’ यानंतर दुसऱ्या एका झिया उर रहमान साजिद नावाच्या युजरने पीएम मोदींचा अभिनंदनाचा संदेश ट्विट केला आणि लिहिले, ‘खरी गोष्ट ही आहे. भारतीय पंतप्रधानांच्या अभिनंदनपर संदेशातून त्यांच्या सरकारचा पाकिस्तानबाबतचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो, पण आमचे सरकार नेहमीच माफी मागते.

जावेद इक्बाल

जावेद इक्बाल नावाच्या युजरने लिहिले, ‘मग या सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? ते लुटारू आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडून मुत्सद्देगिरीची अपेक्षा करता. हे लोक मोदी आणि अमेरिकेला कोणत्याही किंमतीत खुश ठेवतील. तुम्ही इम्रान खानवर टीका करायचा. पण आता शाहबाजकडून आशा ठेवून वेळ वाया घालवत आहात. तर सज्जाद सईद नावाच्या युजरने लिहिले की, ‘पाकिस्तानची पहिली औपचारिक शरणागती. अतिशय कमकुवत प्रतिसाद. ही प्रतिक्रिया केवळ काश्मीर प्रश्नालाच कमी करत नाही. तर 5 ऑगस्ट रोजी भारताच्या एकतर्फी कारवाईनंतर पाकिस्तानच्या अथक प्रयत्नांनाही खीळ घालते. अशी प्रतिक्रिया शरीफ कुटुंबीयांकडून येणं यात नवल नाही. हे खूप दुःखी आहे. इनायत शाह नावाच्या युजरने लिहिले, ‘होय, पाकिस्तानने माफी मागू नये. सहमत, पण दुर्दैवाने, पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान हे पाकिस्तानचे प्रतिनिधी नसून त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप संपवण्यासाठी ते अमेरिकेच्या अजेंड्यावर चालणारे आहेत.

इतर बातम्या :

Inflation: महागाईनं खिसा फाडला! किरकोळ पाठोपाठ होलसेल बाजारातही महागाईचा उच्चांकी दर

Nana Patole Vs Raj Thackeray : मी स्वत: हिंदू, रोज हनुमान चालिसा वाचतो, नाना पटोलेंचा ‘बाऊ’ न करण्याचा सल्ला, नाना बॅकफुटवर?

Post Office : 10 वर्षात या सरकारी योजनेत दुप्पट होणार रक्कम, जाणून घ्या योजनेची सर्व वैशिष्ट्ये

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.