AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MILAN 2026 : एका छोट्या देशाच्या नौदलाने 33 देशांवर मात करुन शोधून काढली भारताची पाणबुडी

MILAN 2026 : सध्या अनेक देशांकडे प्रगत नौदल तंत्रज्ञान आहे. म्हणजे समुद्रातील घडामोडी सहज कळतात. अनेक गोष्टी शोधून काढता येतात. पण एका छोट्या देशाच्या नौदलाने एक मोठी कामगिरी केली आहे. नौदल युद्धातील सर्वात कठीण मिशनमध्ये हा कारनामा केलाय.

MILAN 2026 : एका छोट्या देशाच्या नौदलाने 33 देशांवर मात करुन शोधून काढली भारताची पाणबुडी
Indian navy Image Credit source: PTI
| Updated on: Mar 28, 2026 | 2:36 PM
Share

भारतात आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे मिलन-2026 नौदल कवायत आयोजित करण्यात आली होती. या युद्ध अभ्यासात 30 पेक्षा जास्त देशांच्या नौदलांनी भाग घेतला होता. यावेळी फिलीपींसच्या नौदलाने मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या गायडेड मिसाइल फ्रिगेट BRP मिगुएल मालवरने (FFG-6) भारतीय नौदलाच्या एका पाणबुडीचा यशस्वीरित्या शोध लावला. फिलीपींसच्या युद्धनौकेशिवाय अन्य कुठल्या फ्रिगेटला असा कारनामा करता आला नाही. या युद्ध अभ्यासात 30 पेक्षा जास्त देश सहभागी झाले होते. या सरावात सहभागी युद्ध नौकांपैकी केवळ मालवरच एक युद्धनौका आहे जिने भारतीय पाणबुडी शोधून काढली असं फिलीपीन सशस्त्र पथकाच्या वेस्ट फिलीपीन सागरचे प्रवक्ते रियर एडमिरल रॉय विंसेंट त्रिनिदाद यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे.

या युद्ध सरावात वेगवेगळ्या देशांच्या 33 युद्धनौका सहभागी झाल्या होत्या असं विसेंट त्रिनिदाद म्हणाले. अँटी सबमरीन वॉरफेयर संचालना दरम्यान केवळ आमच्या देशाची युद्धनौकाच पाणबुडीचा शोध लावू शकली. यातून आमच्या नौदलाची वाढती क्षमता दिसून येते. कारण अन्य देशांना असं करता आलं नाही असं त्रिनिदाद म्हणाले.

नौदल युद्धातील सर्वात कठिण मिशन

समुद्रात पाणबुडी शोधून काढणं हे नौदल युद्धातील सर्वात कठिण मिशन मानलं जातं. त्यासाठी अत्याधुनिक सिस्टिम आणि अत्याधुनिक प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज लागते. आपल्या नौदलाच्या या कामगिरीमुळे वेस्ट फिलीपीन सागरचे प्रवक्ते रियर एडमिरल रॉय विंसेंट त्रिनिदाद उत्साहात दिसले. “कागदावर आमच्या देशाच्या नौदलाची उपकरणं दुसऱ्यांच्या तोडीची नाहीयत. युद्ध नौकांची टेक्नेलॉजी सुद्धा खूप आधुनिक नाहीय. दुसऱ्या युद्धनौकांसारख्या नौका आमच्याकडे नाही. पण देशाच्या नौसैनिकांची व्यक्तिगत कुशलता कमाल आहे. नाविकाने ध्वनीच्या प्रसारातील अंतर ओळखून पाणबुडी शोधून काढण्यात यश मिळवलं” असं विंसेंट त्रिनिदाद म्हणाले.

भारताकडे होतं यजमानपद

त्रिनिदाद यांच्या मते फिलीपीनी सैनिक आणि नाविकाच्या कौशल्याचं हे उत्तम उदहारण आहे. फेब्रुवारी महिन्यात हा युद्ध सराव झाला होता. 17 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित Exercise MILAN 2026 मध्ये अनेक देशांची नौदल एकत्र आली होती. भारताच्या यजमान पदाखाली होत असलेल्या या बहुराष्ट्रीय अभ्यासात फिलीपीन नौदल प्रथमच सहभागी झालं होतं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?