शाळेत फी ऐवजी प्लास्टिक बॉटल, पालकांसाठी नवी मोहीम

नायझेरियामधील लागोस शहरातील एका शाळेने मुलांच्या फी ऐवजी पालकांकडू प्लास्टिक बॉटल घेतल्या आहेत. यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेत एका बॅगेत प्लास्टिकच्या बॉटल घेऊन जावे लागत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:30 PM, 14 Jun 2019
शाळेत फी ऐवजी प्लास्टिक बॉटल, पालकांसाठी नवी मोहीम

अबुजा (नायझेरिया) : नायझेरियामधील लागोस शहरातील एका शाळेने मुलांच्या फी ऐवजी पालकांकडू प्लास्टिक बॉटल घेतल्या आहेत. यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेत एका बॅगेत प्लास्टिकच्या बॉटल घेऊन जावे लागत आहे. या प्लास्टिक बॉटलचे वजन केल्यावर जी किंमत मिळते ती मुलांच्या फी मधून कमी केली जाते. यामुळे कुटुंबाचे दोन फायदे झाले आहेत. एक म्हणजे कुटुंबावर आर्थिक भार कमी झाला आणि दुसरा शहरातील पर्यावरणही साफ होत आहे. भारतातील पूर्वेकडील राज्यात आसाममधील ही एका शाळेत प्लास्टिक बॉटल फी म्हणून घेतले जातात.

अफ्रिकन क्लीन अप इनिशिएटिव्ह आणि वीसाईक्लर्स संस्थेच्या मदतीने हा प्रोजेक्ट मॉरिट इंटरनॅशनल स्कूलमध्य सुरु करण्यात आला आहे. लवकरच हा प्रोजेक्ट इतर शाळेत सुरु केला जाईल. या यापुढे पैशांच्या अडचणीने मुलांना शाळा सोडावी लागणार नसल्याने पालकही या योजनेमुळे खूश असल्याचे दिसत आहेत.

“पहिले शाळेची फी भरताना खूप अडचणी येत होत्या. अनेकवेळा मी आर्धी फी भरली होती. बाकी फी हळू-हळू देत होतो. पण या योजनेमुळे आता फी भरणे सोपे झाले आहे”, असं अजेनगुलेचे राहणारे शेरिफत ओंकुवो म्हणाले.

मुलांना शिक्षण मिळण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. आम्ही पहिल्यापेक्षा आता लवकर फी घेऊ शकतो. कारण आता पालाकांना प्लास्टिक बॉटल देणे सोपे झाले आहे. अजेनगुले लागोसही सर्वात जास्त लोकसंख्या असलेली वस्ती आहे. येथे अंदाजे 30 लाख लोक राहतात, असं शाळेच्या मुख्याधापकांनी सांगितले.

जगातील अनेक शहरात औद्योगीकरणामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषणात वाढ झाली आहे. गाडीमधील धूर, प्लास्टिक पिशव्यामुळे पाण्यामध्येही प्रदुषण वाढले आहे. यावर आळा बसण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी संस्था काम करत आहे. सध्या नायझेरियनमधील पर्यावरण संस्थेच्या योजनेमुळे जगभरात या संस्थेचे कौतुक केले जात आहे.