
Narendra Modi Calls Vladimir Putin : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे. भारत रशियाकडून कमी किमतीत कच्चे तेल खरेदी करतो. त्यामुळे भारताने दिलेल्या पैशांच्या माध्यमातून रशिया युक्रेनवर हल्ले करतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मत आहे. त्यामुळेच त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला आहे. भारताने रशियासोबतचा व्यापार कमी करावा, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. दरम्यान, एकीकडून ट्रम्प यांचा भारतावर दबाव असला तरी या दबावाला झुगारून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना कॉल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार व्लादिमीर पुतिन यांचा मंगळवारी (7 ऑक्टोबरर) 73 वा वाढदिवस आहे. याचेच निमित्त साधून नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना कॉल केला. फोन कॉलद्वारे मोदी यांनी पुतिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली. याआधी पुतिन यांनीदेखील नरेंद्र मोदी यांनी कॉलद्वारे वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या होते. आता मोदी यांनीदेखील पुतिन यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. या फोन कॉलमध्ये आम्ही तुमचे (पुतिन) भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहोत, असेही यावेळी मोदी म्हणाले. पुतिन या वर्षाच्या शेवटी भारतात येण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात भारतात येण्याची शक्यता आहे. पुतिन भारतात आल्यानंतर 23 वे द्विपक्षीय शिखर संमेलन होणार आहे. याच शिखर संमेलनासाठी भारत पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी उत्सूक असल्याचे मोदी यांनी पुतिन यांना कळवले आहे. पुतिन भारतात आल्यानंतर दोन्ही देशातील व्यापार तसेच इतर अनेक योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारताने रशियासोबतचा करार कमी करावा, अशी ट्रम्प यांची मागणी आहे. याच मागणीमुळे ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, असेही अमेरिकेचे मत आहे. मात्र अमेरिकेच्या धोरणाला न जुमानता भारत अजूनही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो. रशिया भारताला विशेष सवलत देऊ करतो. त्यामुळेच भारतानेही रशियासोबतचा आपला तेल खरेदीचा व्यापार थांबवलेला नाही. असे असताना मोदी यांनी पुतिन यांना थेट कॉल करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्यांनी दोन्ही देशांतील व्यापार आणखी दृढ करण्यावरही चर्चा केली आहे. हीच चर्चा ट्रम्प यांच्यासाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात रशिया-भारत या दोन्ही देशांच्या संबंधांबाबत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.