AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींचे विमान तब्बल 46 मिनिटे पाकिस्तानी एअरस्पेसमध्ये, पाक माध्यमांच्या दाव्यामुळे…

PM Narendra Modi Plane: जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या 44 जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मोदी सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरचा असलेला विशेष दर्जा आणि कलम 370 रद्द केले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत असलेला सर्व द्विपक्षीय व्यापर थांबवला होता.

नरेंद्र मोदींचे विमान तब्बल 46 मिनिटे पाकिस्तानी एअरस्पेसमध्ये, पाक माध्यमांच्या दाव्यामुळे...
Narendra Modi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 26, 2024 | 11:01 AM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पाकिस्तानी हवाईक्षेत्राचा (एअरस्पेश) वापर केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. जिओ न्यूजने पाकिस्तान नागरिक उड्डान मंत्रालयाच्या सूत्रांनी ही बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड दौऱ्यावरुन भारतात परत येत असताना तब्बल 46 मिनिटे पाकिस्तानी हवाईक्षेत्रात होते, असा दावा या वृत्तात केला आहे.

46 मिनिटे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात

पाकिस्तानी नागिरक उड्डान मंत्रालयानुसार, नरेंद्र मोदी यांचे विमान सकाळी 10:15 वाजता पाकिस्तानी हवाईक्षेत्रात दाखल झाले. त्यानंतर तब्बल 46 मिनिटे हे विमान पाकिस्तानी हवाई क्षेत्रात होते. सकाळी 11:01 मिनिटांनी पाकिस्तानी हवाईक्षेत्रातून हे विमान बाहेर पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान चित्राल मार्गाने पाकिस्तानी एअरस्पेशमध्ये दाखल झाले. इस्लामाबाद, लाहोर येथील हवाई क्षेत्रात हे विमान होते.

सदिच्छा संदेश दिला नाही

पाकिस्तानच्या प्रमुख वृत्तपत्र डॉनने आपल्या वृत्तात लिहिले आहे की, भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात असताना सदिच्छा संदेश देण्याची परंपरा पाळली नाही. ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणावाच्या चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. डॉनने विमान वाहतूक मंत्रालयातील एका सूत्राचा हवाला देत सांगितले की, सदिच्छा संदेश पाठवणे ही एक परंपरा आहे आणि सक्ती नाही.

पोलंडवरुन परत येत असताना वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनची राजधानी कीव जाताना पोलंडची राजधानी वारसॉ येथे गेले होते. कीवमध्ये त्यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांची भेट घेतली. मोदी यांच्या या दौऱ्याची चर्चा जगभरातील माध्यमांनी घेतली. या दौऱ्यावरुन परत येत असताना मोदी यांच्या विमानाने पाकिस्तानी हवाईमार्गातून प्रवास केला.

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या 44 जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मोदी सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरचा असलेला विशेष दर्जा आणि कलम 370 रद्द केले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत असलेला सर्व द्विपक्षीय व्यापर थांबवला होता.

Follow Us
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद