AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थायलंडमध्ये नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत, ‘थाई रामायण’ महाकाव्याचे अनोखे सादरीकरण!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या थायलंडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले जात आहे.

थायलंडमध्ये नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत, 'थाई रामायण' महाकाव्याचे अनोखे सादरीकरण!
narendra modi thailand visit
| Edited By: | Updated on: Apr 03, 2025 | 8:49 PM
Share

Narendra Modi  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि थायलंड या दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील अशी आसा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे थायलंडमध्ये जंगी स्वागत झाले. याच स्वागताचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी यांचे स्वागत थायलंडचे ‘रामकियेन’ या महाकाव्यच्या सादरीकरणाने करण्यात आले.

रामकियेन’ चा नृत्याविष्कार सादर

नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर असताना पहिल्या दिवशी ते बँकॉक येथे पोहोचले. तेथे मोदी यांच्यासाठी रामायणचे थाई रुपांतर असलेला ‘रामकियेन’ या महाकाव्याचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. रामकियेन हे थायलंडच्या संस्कृतीचा प्रभाव असलेले रामायण आहे. या रामकियेनकडे थायलंडमध्ये राष्ट्रीय महाकाव्य म्हणून पाहिले जाते.

दोन नृत्यशैलींचे मिश्रण, अद्भूत नृत्याविष्कार सादर

थायलंडमधील बुंदितपाटनसिल्पा इन्स्टिट्यूटच्या (Bunditpatanasilpa Institute) संगीत आणि नाट्यविभागाच्या विद्यार्थ्यांनी रामकियेन हे नाट्य सादर केले. एकलक नु-नगोएन यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण झाले. या महाकाव्याचे सादरीकरण भारतातील भरतनाट्यम आणि थायलंडमधील खोन या दोन्ही नृत्यशैलीत सादर करण्यात आले. भारत आणि थायलंड यांच्यातील संबंधाचे प्रतिक म्हणून अशा प्रकारच्या नृत्याची रचना करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा नृत्याविष्कार पाहिल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल आहेत.

मोदींसाठी गरबा नृत्याचे सादरीकरण

थायलंड आणि भारतात रामायणाला विशेष असे महत्त्व आहे. भारतात भगवान रामाची अयोध्येचे राजकुमार म्हणून पूजा केली जाते. तर थायलंडच्या संस्कृतीत प्रभू रामाला ‘फ्रा राम’ या नावाने ओळखले जाते. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बँकॉकमध्ये त्याच्या हॉटेलमध्ये पोहोचले होते, तेव्हा थायलंडतर्फे त्यांच्या स्वागतासाठी गरबा नृत्य सादर केले होते. येथे आल्यानंतर मोदी यांनी थायलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांशी संवाद साधला होता.

दरम्यान, नरेंद्र मोदी हे थायलंडच्या दौऱ्यावर असताना थायलंड सरकारने एक विशेष आयस्टॅम्प जारी केला आहे. या आयस्टॅम्पवर रामायणावर आधारलेली पेंटिंग आहे. या आयस्टॅम्पचा फोटोही मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यावर अपलोड केला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?