ऐन लोकसभा निवडणूकीत मोदी चालले भूतान दौऱ्यावर ? काय आहे नेमके कारण

ऐन निवडणूकांच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दौऱ्यावर जात आहेत. निवडणूकांची आचारसंहिता लागू झाल्याने दोन्ही देशात कोणताही सामजंस्य करार घोषीत केला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. चीनशी आपले संबंध बिघडलेले असल्याने हा दौरा खूपच महत्वाचा असल्यानेच मोदी चालले आहेत.

ऐन लोकसभा निवडणूकीत मोदी चालले भूतान दौऱ्यावर ? काय आहे नेमके कारण
PM MODI VISIT TO BHUTAN
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 5:43 PM

नवी दिल्ली | 18 मार्च 2024 : एकीकडे लोकसभा निवडणूकांची घोषणा झाली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर चालले आहेत. लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता लागू झाल्याने या दौऱ्या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही करारासंदर्भात घोषणा केली जाणार नाही. तरीही हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी अलिकडेच भारताचा दौरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांचा दौरा होत आहे. एकीकडे निवडणूकांची घोषणा केली आहे आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात असल्याने या दौऱ्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

डॉ.मनमोहन सिंह यांनी देखील केला होता दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी साल 2009 मध्ये देखील भारताचे तत्कालिन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी देखील निवडणूकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर ब्रिटनचा दौरा केला होता. त्यावेळी मनमोहन सिंह जी-20 शिखर संमेलनासाठी गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21-22 मार्च रोजी भूतानच्या छोट्या दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा दोन देशांसाठी खूपच महत्वाचा आहे. चीन सोबत आपल्या संबंध तणावाचे असताना हा दौरा होत आहे. त्यामुळे भारतीय परराष्ट्रनीतीच्या दृष्टीने हा महत्वाचा दौरा आहेय. शेरिंग सरकार असताना चीन सोबत सीमावाद सोडविण्यास मदत झाली होती. त्यावेळी चीन आणि भूतान दरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला होता.

भूतानची साथ महत्वाची

भारत, भूतान आणि चीन यांच्या सीमा अनेक ठिकाणी ‘चिकन्स नेक’ मध्ये परावर्तित झालेल्या आहेत. चीन आणि भारतीय सैन्यात दोन वर्षांपूर्वी डोकलाम येथे चकमक झाली होती. हा परिसर ट्राय जंक्शनचा होता. पूर्वोत्तर परिसरात अशा सीमा संवदेनशील असतात. भूतान आणि चीन दरम्यान झालेल्या सामंजस्य करारात सीमांची अदलाबदल करण्याचा देखील करार होता. जानेवारी महिन्यात पदभार सांभाळल्यानंतर भूतानचे पंतप्रधान पहिल्यांदा परदेश भेटीवर भारतात आले होते. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानला भेट देऊन दोन्ही देशांचे संबंध दृढ करु इच्छित आहेत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.