AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन, आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार हालचाली?

इस्रायल आणि इराण या दोन देशांमधील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संघर्षाचा जगावर मोठा परिणाम होऊ शकतो. दोन्ही देशांच्या प्रमुखांना अनेक देशाच्या प्रमुखांनी फोनवरुन संपर्क साधला आहे. दोन्ही देशांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन, आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार हालचाली?
putin call Raisi
| Updated on: Apr 18, 2024 | 9:33 PM
Share

 Israel-iran conflict : इस्रायल आणि इराणमध्ये सध्या संघर्षाची स्थिती आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्यासारखी परिस्थिती आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना युद्ध टाळण्याचे आवाहन केले आहे. नेतान्याहू हे सगळ्या देशांच्या प्रमुखांना मत जाणून घेत आहेत. पण ते संघर्षावर ठाम आहेत. इराणला धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी आधीच दिला आहे. इराणवर हमासला शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना फोन करून संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. युक्रेन युद्धात इराण रशियाला ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा करत आहे.

पुतिन आणि रायसी यांच्यात चर्चा

अल जझीराच्या वृत्तानुसार, व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्याशी फोनवर संभाषण केले. सीरियाची राजधानी दमास्कस येथील इराणच्या दूतावासावर 1 एप्रिल रोजी इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने केलेल्या प्रत्युत्तराच्या उपाययोजनांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

व्लादिमीर पुतिन यांनी इराणला संयम बाळगण्याचा आणि कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळण्याचा सल्ला दिल्याची माहिती क्रेमलिनकडून देण्यात आली. इराण आणि इस्रायल यांच्यातील परिस्थिती आणखी बिघडली तर त्याचे मध्यपूर्वेसाठी भयंकर परिणाम होतील, अशी भीती पुतीन यांनी व्यक्त केली.

इस्रायलच्या हल्ल्यात १३ लोकांचा मृत्यू

1 एप्रिल रोजी दमास्कसमध्ये इस्रायली हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च कमांडरसह 13 लोक मारले गेले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर 300 हून अधिक ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने हे सूडाचे कृत्य म्हटले होते.

क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, “व्लादिमीर पुतिन यांनी आशा व्यक्त केली की दोन्ही देश संयम दाखवतील आणि संपूर्ण क्षेत्रासाठी विनाशकारी परिणामांनी भरलेल्या संघर्षाच्या नवीन फेरीला प्रतिबंध करतील.” पुतीन यांच्याशी फोन कॉलमध्ये इब्राहिम रायसी यांनी प्रत्युत्तराच्या हल्ल्याचा बचाव केला आणि सांगितले की त्यांची प्रतिक्रिया आवश्यक होती. त्याचबरोबर तणाव आणखी वाढू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.